पंढरपूर : एकीकडे देशात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना पंढरीचा विठुराया देखील देशप्रेमात न्हाहून निघाला आहे. मंदिराला तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई तसंच फुलांची आरास करण्यात आली आहे. यात सावळ्या विठुरायाचे राजस सुकुमार रूप अधिकच खुलून दिसत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंदिरावर, दर्शन मंडप, भक्त निवास येथे विद्युत रोषणाई केली आहे.तसेच मंदिरात देखील आकर्षक फुलांनी सजवले आहे. मंदिरातील प्रवेशद्वार, सोळखांबी, मंदिरा बाहेर अशा ठिकाणी तीन रंगांच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. सलग सुट्टी व श्रावण महिना असल्याने भाविकांची गर्दी झाली आहे. हेही वाचा.Supriya Sule : “मी माझ्या बहिणींना विनंती करते…”, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आल्यानंतर सुप्रिया सुळेंचं महिलांना आवाहन! फुलांची आरास केल्याने विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. अशा या भक्ती रसात तीरंगी फुलांची आरास केल्याने देशप्रेमात देखील न्हाहून निघाला असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही.