पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आणि दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ दर्शन व्हावे या उद्देशाने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे आदेश काढले. या आदेशाचे उल्लंघन करणार्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार असे जाहीर केले. मात्र भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दर्शनासाठी तात्कळत ठेवले. तर दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अनेक समर्थकांनी धक्का बुक्की करत मंदिरात प्रवेश केला. व्हीआयपी दर्शन बंद आहे. याचे भान मंत्र्यांना राहिले नाही. मात्र आम्ही अडीचशे किलोमीटर दूरवरून आलोय . सोबतच्या लोकांनी दर्शन घेतल्याची कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. मात्र या घटनेवरून व्हीआयपी दर्शन बंदीच्या आदेशाचा फज्जा उडाला.

आषाढी वारीला लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. दर्शन रांगेत तासान तास उभे राहतात. असे असताना दुसरीकडे व्हीआयपी म्हणजे राजकारणी,अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व अन्य मंडळी दर्शन रांग सोडून झटपट दर्शन करतात. त्यामुळे रांगेतील भाविकांच्या दर्शनाला वेळ लागतो.

या साऱ्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी १५ जुलै पासून विठ्ठलाचे व्हिआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दिले. त्यावर देखरेख आणि अंमलबजावणी करण्यासाठी दोन महसूलचे अधिकारी नियुक्त केले. मात्र काही तासात एका सामजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी दर्शन घेतले. त्या नंतर भाजपाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे दर्शनाला आले. मात्र व्हीयापी दर्शन बंद आहे असे सांगण्यात आले. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक याना संपर्क केले. मात्र काही वेळाने त्यांना दर्शनाला सोडण्यात आले. त्या नंतर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त करत महसूल,मंदिर समिती यांच्यात समन्वय नाही. मंदिर समिती कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे पंढरपूरला आले. ते दर्शनला आले असता मंदिराच्या दरवाज्यावर समर्थकांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्र्यांच्या पाठोपाठ मंदिरात घुसून प्रवेश केल्याचे दिसून आले. त्या नंतर त्यांनी आपण लोकप्रतिनिधी आहोत अडीचशे किलोमीटर वरून प्रवास करून येतो. मग दर्शनाला द्यायलाच पाहिजे. माझ्या सोबतचे लोक थेट दर्शनाला सोडल्याची कबुलीही मंत्री पाटील यांनी दिली.मात्र जो उद्देश ठेवून व्हीआयपी दर्शन बंद ठेवले त्या नियमाचा उल्लंघन मंत्र्यांनी केल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

पुढाऱ्यांना आणि समर्थकांना सुबुद्धी द्या

आम्ही दिवस रात्र, खाणे पिणे सोडून विठ्लाच्या दर्शनसाठी रांगेत तासन तास उभे राहतो. मात्र अनेक वेळा रांग थांबली जाते. चौकशी केल्यावर समजते मंत्री,अधिकारी आलेत. त्यामुळे दर्शन बंद केले. ते लोक दर्शन घेतात, फोटो काढतात, सत्कार होतो. तो पर्यंत रांग बंद ठेवतात. त्यामुळे किमान वारी होई पर्यंत कोण्या मंत्री,अधिकारी,व अन्य लोकाना सुबुद्धी द्या अशी मागणी भाविकांनी केली आहे.