विश्वास पवार : वाई:

अश्‍व धावे अश्‍वामागे।

NANA PATOLE AND SHAHU MAHARAJ
शाहू महाराजांच्या उमेदवारीवर नाना पटोलेंचे महत्त्वाचे भाष्य; म्हणाले, “छत्रपती परिवाराकडून…”
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
mhada Lottery
छत्रपती संभाजीनगरातील ९४१ सदनिका, ३६१ भूखंडांची सोडत जाहीर, अर्ज विक्री-स्वीकृतीला सुरुवात
Demand march regarding road in Kolhapur
चांगले रस्ते वा हाडांचे दवाखाने द्या; कोल्हापुरात अनोख्या मागणीचा मोर्चा

वैष्णव उभे रिंगणी।

टाळ, मृदुंगा संगे।

गेले रिंगण रुगुनी॥

या रचे प्रमाणे वैष्णवांच्या दाटीत अश्‍वांच्या नेत्रदिपक दौडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदुगांच्या गजरात विठ्ठल…..विठ्ठल नामाचा उद्घोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहीले उभे रिंगण पार दुपारी  पार पडले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबध्द उभी रांग…माऊलींच्या आश्‍वांनी घेतलेली दौड…दिंडीतील वारकर्‍यांच्या पायांनी घरलेला ठेका…टाळ-मृदंगांच्या दाटीत रंगलेल्या फुगड्या अन हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात माऊली, माऊलीचा जोरदार गजराने आसमंत दुमदुमत असतानाच टाळमृदंगाचा टिपेला पोहोचलेला नाद आणि हातातील भगवी पताका उंचावत तल्लीन नाचणार्‍या वारकर्‍यांच्या जोशात  चांदोबाचा लिंब तरडगावात येथे वारीतील पहिल्या उभ्या रिंगणाने उपस्थितासह वारकर्‍यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखीला लोणंद ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला व माध्यान्ह आरती झाली. पुढील प्रवासाला निघण्याचे संकेत देणारा भोंगावाजताच माऊलीच्या जयजयकारात मानकऱ्यांनी पालखी सजवलेल्या रथात ठेवली व लगेचच सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला.फलटणच्या कापडगाव येथील सरहद्दीवर फलटण तालुक्याच्या वतीने आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  संजीवराजे नाईक निंबाळकर, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे,तहसीलदार समीर यादव, पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड,गटविकास अधिकारी डॉ अमिता गावडे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे,फलटण ग्रामिण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केले.

सोहळा पुढे सरकत चांदोबाचा लिंब येथे आला.या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविंकांनी पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दरम्यान माऊलीचां रथ चांदोबाचा लिंब येथे आला गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत होता. अखेर पालखी सोहळ्याचे चोपदार यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली.कोणतीही सुचना न देता वारकर्‍यांच्या गर्दीतुन हजारो लाखो वारकरी दुतर्फा झाले व अश्‍व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली.दुसरीकडे अश्व धावणार असलेल्या मार्गावर रंगीबेरंगी रांगोळी घालुन वातावरणात अधिक प्रसन्नता आणली . रिंगण लावल्यानतंर रथापुढील २७ दिंड्यांमधून माऊलींचा अश्‍व पुजार्‍यांनी दौडत आणला.

सर्व दिंडीकरांचा टाळ मृदंगाच्या आवाजात माऊलींचा होत असलेला गजर सुरू असतानाच दौडत आलेल्या दोन्ही अश्वांना पाहून वारकरी देहभान विसरून दंग झाले. पाहता पाहता दोन्ही अश्वांनी माऊलींच्या रथाला प्रदक्षिणा घातली व संत ज्ञानेश्वर पादुकांचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्‍व मागील दिंड्यापर्यत्र नेल्यानंतर माघारी पळत आला.माऊलींच्या रथा जवळ अश्‍व आल्यांनतर सोहळा प्रमुखांनी अश्‍वास पुष्पहार घालुन खारीक-खोबर्‍याचा नैवद्य दाखविला त्यानंतर अश्‍वाने दौड घेतली.पुढे माऊलींचा अश्‍व व मागे स्वारीच अश्‍व अशी दौड पुर्ण झाली. अश्व दौडत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पोहोचताच चोपदारांनी रथावर उभे राहुन हातातील दंड फिरवून रिंगण संपन्न झाल्याचे दर्शवले. यानंतर सोहळा माऊलींचा गजर करत पुढे मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.