scorecardresearch

महिलांना मंदिर प्रवेशापेक्षा आर्थिक सक्षमीकरणाची गरज – पंकजा मुंडे

राज्यभरातील मंदिरात महिलांच्या आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई आणि भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चांगलेच फटकारले आहे.

Pankaja Munde , corruption allegations, Drought selfie, Maharashtra, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
पंकजा मुंडे

राज्यभरातील मंदिरात महिलांच्या आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई आणि भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चांगलेच फटकारले आहे. महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळण्यापेक्षा आíथक स्वातंत्र्य आणि राजकारणाच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळणे गरजेचे आहे. यासाठी गावागावात महिला बचत गट चळवळी बळकट करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्या महाड येथील हिरवळ संस्थेच्या पहिल्या महिला बचत गटाच्या विक्री केंद्राच्या उद्घाटन समारंभात मुंडे बोलत होत्या. महिला आíथकदृष्टय़ा सक्षम झाल्या तर त्या स्वयंपूर्ण होऊ शकतात. घरखर्चात हातभार लावू शकतात. त्यामुळे महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळतो की नाही यापेक्षा त्या आíथकदृष्टय़ा सक्षम कशा होतील, हे पाहणे गरजेचे आहे. राजकारणातही महिलांचा सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
हिरवळ संस्थेचे तालुक्यात महिलांचे ४०० बचत गट असून त्यांनी उत्पादन केलेल्या वस्तूंना विक्रीव्यवस्थेसाठी स्वत:च्या पेट्रोल पंपातील जागेत संधी देऊन धारिया यांनी एक नवीन पायंडा पाडल्याचे ना. मुंडे यांनी त्यांचे कौतुक केले. या वेळी त्यांच्यासमवेतग्रामविकास व अर्थ राज्यमंत्री ना. दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री प्रभाकर मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
आमदारांप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यांना निधी देण्याचा विचार
आमदारांप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांनाही विकास निधी मिळावा, अशी मागणी केली जात आहे. त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे. राज्याच्या अर्थ व नियोजन विभागाशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या मतदारसंघात विकास कामे करायची असतील तर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. यात विरोधी पक्षातील सदस्यांची मोठी अडचण होते. म्हणून आमदारांप्रमाणे प्रत्येक सदस्याला स्वत:च्या मतदारसंघात काम करण्यासाठी स्वतंत्र निधी देता येईल का याबाबतचा विचार ग्राम विकास मंत्रालय करत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. महाड पंचायत समितीचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्यात आता सत्तर हजार कोटी नव्हे तर केवळ सोळा हजार कोटी रुपयांच्या मंजुरीत सिंचनाचे खरे काम करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. सिंचनाकरिता किती पसे लागतात हे आता बाहेर येईल, असा टोला त्यांनी माजी जलंसपदा मंत्री सुनील तटकरे यांचे नाव न घेता लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-04-2016 at 01:46 IST

संबंधित बातम्या