भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यानंतर भाजपासह विरोधकांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच पंकजा मुंडे नाराज असल्याचे तर्कवितर्क लावले गेले. मात्र, आता स्वतः पंकजा मुंडे यांनीच आपल्या संपूर्ण भाषणाच्या व्हिडीओची लिंक पोस्ट करत या वादावर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी ‘सनसनीखेज’ बातम्यांतून जमले, तर हेही पहा, असं मत व्यक्त केलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलनमधील माझ्या भाषणाच्या ‘हायलाईट्स’. आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे. ‘सनसनीखेज’ बातम्यांतून जमले, तर हेही पहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या लिंकवर आहेच. धन्यवाद.”

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“मोदी मला संपवू शकत नाहीत असा पंकजा मुंडेंच्या म्हणण्याचा अर्थ नव्हताच. मोदींनी वंशवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे, पण मी जर जनतेच्या ह्रदयाचं प्रतिक असेन तर निश्चितच या वंशवादात बसणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे,” असं सांगत मुनगंटीवार यांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची पाठराखण केली.

पुढे ते म्हणाले “अनेकदा असं होतं की, पात्रता नसताना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून एका पदावर जातो. एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाचा मुलगा म्हणून पात्र नसतानाही त्या पदावर जाण्याचा प्रयत्न करतो. नेमका हाच भाव असावा असं मला वाटतं”. यासंबंधीच अधिक स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांच्याकडूनच घेतलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.

“पंकजा मुंडेंनी मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर…”

पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे. त्या मोदींना आव्हान देऊ शकत नाही. त्यांच्या विधानाचा अर्थही तसा घेऊ नये, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, मी अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं असेल, तर मला कुणीही पराभूत करू शकत नाही, ही त्यांची भावना असेल, त्यांनी मोंदीचं नाव नेमक्या कोणत्या अर्थाने घेतलं, हे कदाचित मला सांगता येणार नाही. पण यातून मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे.

हेही वाचा : “…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

मला वाटतं त्या मोदींना आव्हानही देऊ शकत नाही आणि त्यांच्या विधानाचा तसा अर्थही घेऊ नये. कारण त्या पार्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेकदा मोदींबाबत किंवा पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत नाराजी व्यक्ती केली आहे. तरीही त्या केंद्रीय नेत्यांचं नेतृत्व मान्य करून आपल्या पक्षासाठी काम करत आहेत, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, “आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपरिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलीकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत.”