मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे. तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच असल्याचं सूचक विधानही मिटकरींनी केलं आहे. विशेष म्हणजे पंकजा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचंही मत सकारात्मक असल्याचे संकेत मिटकरींनी दिले आहेत.

नक्की वाचा >> ‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार? उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”

भाजपाने २०२४ च्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या ‘४५ प्लस’ या ४५ पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकण्याच्या मोहिमेत बारामतीमध्ये नंबर एकला आमची जागा असेल, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे. याचसंदर्भातून टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत मिटकरींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “उम्मीद पे दुनिया कायम हैं. बावनकुळेंना वाटतं ना? पण जनतेच्या मनात काय आहे? जनता त्यांना जागा दाखवून देणार,” असं उत्तर दिलं. तसेच पुढे, “बावनकुळेंना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. जनतेच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं आहे. जसं पंकजाताई काल बोलून गेल्या, मी ठरवलं तर मोदीजीही माझा पराभव करु शकणार नाही. शेवटी जनतेनं परळीमध्ये उत्तर दिलं,” असंही मिटकरी म्हणाले.

Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
rohit pawar and udayanraje bhosale
साताऱ्यात घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होणार? रोहित पवारांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, “उदयनराजे…”
President Ram Nath Kovind and narendra modi
भाजपा अन् देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना; ४० वर्षांपूर्वीचा इतिहास काय?
Case against Congress workers for burning effigy of Prime Minister
पुणे : पंतप्रधानांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

नक्की पाहा >> बाळासाहेबांचा आवाज, हिंदवी तोफ अन्…; CM शिंदेंनी शेअर केला स्वत:चा ‘एकलव्य’ असा उल्लेख ‘शिवसेना दसरा मेळाव्याचा’ टीझर

मिटकरींनी पंकजा मुंडेंचा उल्लेख केल्याने त्यांनी परळीमधील नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात केलेल्या ‘मीच बेरोजगार आहे’ या विधानावरुन पत्रकाराने प्रश्न विचारला. “मी तुम्हाला काय रोजगार देऊन मी बेरोजगार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही त्यांना आवाहन केलं होतं की राष्ट्रवादीत या. आता कसं पाहता याकडे तुम्ही?” असं पत्रकाराने विचारलं.

नक्की वाचा >> ‘खरी शिवसेना’ वाद : “सध्या शिंदेसाहेबांनी पक्षप्रमुख पदावर…”; दिपक केसरकरांचं पक्षप्रमुख पदाबद्दल महत्त्वाचं विधान

या प्रश्नावर उत्तर देताना मिटकरींनी, “मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी त्या मुद्द्यावर ठाम आहे. पंकजाताईंना डावलण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीमध्ये सुरु आहे. तो प्रयत्न फडणवीस सरकारकडून सातत्याने होतो आहे. आतापर्यंतही त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली गेलेली नाही. त्या गोपीनाथराव मुंडेसाहेबांच्या कन्या आहेत. तोलामोलाच्या नेत्या आहेत. त्या महाराष्ट्रातील वजनदार नेत्या आहेत. पण आतापर्यंतही त्यांना न्याय मिळालेला नाही. म्हणूनच त्या अस्वस्थ आहेत. माझा विश्वास आहे की पंकजाताई लवकरच मोठा निर्णय घेतील,” असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: “ते लोक आईवर…”; रश्मी ठाकरेंसंदर्भात शिंदे गटाने केलेल्या दाव्यावरुन आदित्य ठाकरे संतापले

यावरुन पत्रकाराने, “मोठा निर्णय म्हणजे काय? नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? तुम्ही राष्ट्रवादीत त्यांना निमंत्रित केलं होतं” असा संदर्भ देत प्रश्न विचारला. “मी मागंही म्हटलं होतं. सुप्रियाताईंनीही त्याचं समर्थन केलं होतं की जर पंकजाताईंसारख्या बड्या नेत्या पक्षामध्ये येत असतील तर स्वागत आहे. भाजपामध्ये त्या अस्वस्थ आहेत. कालच्या एका शोमध्ये त्यांची वक्तव्यं दाखवली. भगवान गडावरचं वक्तव्य, दसरा मेळाव्यातील वक्तव्य, कार्यकर्ता मेळाव्यातील वक्तव्य असेल. ते सर्व पाहता त्या अस्वस्थ आहेत. भाजपाला त्या सोडचिठ्ठी देतील एवढं मात्र नक्की,” असं मिटकरींनी म्हटलं आहे.