scorecardresearch

Premium

वैद्यनाथ साखर कारखाना १९ कोटी रूपये GST नोटीस प्रकरण, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

“मी सहनशील कन्या आहे”, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

pankaja munde
जीएसटी नोटीसीवर पंकजा मुंडे बोलल्या आहेत. ( संग्रहित छायाचित्र )

भाजपा नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडं १९ कोटी रूपयांची जीएसटी रक्कम थकली आहे. यामुळे कराची वसुली आणि मालमत्ता जप्ती संदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तांनी कारखान्यास नोटीस जारी केल्याचं बोललं जात आहे. यावर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “जे आकडे सांगितले जातात, ते व्याजाबाबत आहेत. कुठेही काहीही चुकीचं झालं नाही. कारखाना तोट्यात असतानाही शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले आहेत. ऊस आणि आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना चालला नाही.”

Uddhav thackeray on nanded case
नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “खेकड्यांच्या हातात…”
uddhav-thackeray-rahul-narwekar
अपात्रता सुनावणी वेळापत्रकावर ठाकरे गटाचा आक्षेप, शिंदे गटाकडून प्रतिक्रिया, म्हणाले…
jitendra awhad sharad pawar dhananjay munde
“शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला सांगणाऱ्यांची लायकी काय?” जितेंद्र आव्हाडांचं धनंजय मुंडेवर टीकास्र
uddhav thackeray rahul narvekar eknath shinde
आमदार अपात्रतेबाबत ‘या’ तारखेला प्रत्यक्ष सुनावणी; ठाकरे गट आरोप करत म्हणाला…

“…तर हे प्रकार घडले नसते”

“८ ते ९ कारखान्यांनी दिल्लीत मदत मागितलेली, त्यात माझेही नाव होतं. पण, मी सोडून बाकींना आर्थिक मदत झाली. मदत मिळाली असती, तर हे प्रकार घडले नसते,” अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

“ज्योतिषाला विचारून सांगते”

राज्यातील भाजपा नेते तुमची कोंडी करत आहेत? कितीदिवस ही कोंडी सहन करणार? या प्रश्नांवरती पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी सहनशील कन्या आहे. कितीदिवस सहन करायचं, हे ज्योतिषाला विचारून सांगते.”

हेही वाचा : “सरकार बदलतात, किंमत मोजावी लागणार”, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा

“…म्हणून कारवाई सुरू झाली असेल”

पंकजा मुंडेंच्या कारखान्याला मिळालेल्या नोटीसीबाबत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही भाष्य केलं आहे. “पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं मला वाटतं” असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pankaja munde on vaidyanath sahkari sakhar karkhana gst notice ssa

First published on: 25-09-2023 at 20:46 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×