scorecardresearch

Dasara Melava 2022: PM मोदींचा उल्लेख करत महादेव जानकर म्हणाले, “पंकजा मुंडेच्या एका…”

Mahadev Jankar On Pankaja Munde : भगवानगड येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे. तेव्हा महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंबाबात मोठं वक्तव्य केलं आहे.

Pankaja Munde Mahadev Jankar
पंकजा मुंडे महादेव जानकर ( संग्रहित फोटो )

महाराष्ट्रात आज ( ५ सप्टेंबर ) तीन दसरा मेळावे पार पडत आहेत. या मेळाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळे मेळावे होणार आहेत. तर, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भाजपा नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्तथितीत भगवानगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यावेळी रासपचे नेते महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडेंबाबत मोठं विधान केलं आहे.

महादेव जानकर म्हणाले, “सुजय विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं पाहिजे की, पंकजा मुंडेंच्या एका ट्वीटवर लाखो लोक गोळा होतात. त्यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रयत्न करावा. मी काही भाजपाचा माणूस नाही, मित्रपक्ष आहे. पंकजा मुंडे आणि महादेव जानकर नसेल, तर तुमचं खरं नाही.”

हेही वाचा – उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कुणाचं भाषण ऐकायची उत्सुकता? पंकजा मुंडे म्हणाल्या,”मी या गोष्टीतून गेले आहे…”

“आमचे शब्द दिल्लीला घेऊन जा…”

“माझी सुजय विखे आणि प्रीतम मुंडेंना विनंती आहे की, तुम्ही दिल्लीचे खासदार येथे आहात. आमचे शब्द दिल्लीला घेऊन जा, ही विनंती आहे. ही पैसे देऊन आलेली माणसं नाहीत, पदरमोड करून आलेली माणसं आहेत. मुंबई, गुजरातहून लोकं आलेली आहेत,” असेही महादेव जानकर यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-10-2022 at 14:10 IST
ताज्या बातम्या