कॉ. पानसरे हत्याप्रकरण: एसआयटीकडून ‘सनातन’च्या महिला साधकांची चौकशी

वीरेंद्र तावडे याने काही काळ सनातनच्या पनवेल येथील आश्रमातही वास्तव्यात केले होते.

Govind Pansare murder chargesheet , Drugs , psychiatric conditions , sadhaks , Sanatan Sanstha , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news, Pansare murder case , sanatan sanstha , SIT, Maharashtra police , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Pansare murder case : पनवेल येथील सनातनच्या आश्रमात पोलिसांना काही औषधेही मिळाली आहेत. सनातनच्या विशेष साधकांना वीरेंद्र तावडे ही औषधे देत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही औषधे शरीरातील मज्जासंस्थेच्या कार्यावर परिणाम करत असल्याची शक्यता आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) बुधवारी सनातन संस्थेच्या दोन महिला साधकांना ताब्यात घेतले आहे. सध्या कोल्हापूर पोलिसांकडून या पनवेल आश्रमातील महिला साधकांची कसून चौकशी सुरु असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याने वास्तव्य केलेल्या ठिकाणांविषयी या महिला साधकांना प्रश्न विचारण्यात येत असल्याचे समजते. वीरेंद्र तावडे याने काही काळ सनातनच्या पनवेल येथील आश्रमातही वास्तव्यात केले होते. त्यामुळे पोलिसांनी तावडे राहत असलेल्या ठिकाणाचीही पाहणी केल्याचे समजते.
तावडेच्या कोठडीतील अन्य आरोपींना हलविले
सध्या एसआयटीच्या चार पथकांकडून तावडे याचा तपास सुरू असून त्याने दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्याने त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींकडून माहितीची पडताळणी केली जात आहे. यासाठी सनातनच्या पनवेल येथील आश्रमातील एक डॉक्टर आणि एका ड्रायव्हरचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता.
वीरेंद्र तावडे याने अनेक महिने वापरलेली चारचाकी गाडीदेखील कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागली आहे. याशिवाय, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात पोलिसांना काही औषधेही मिळाली आहेत. ही संशयास्पद औषधे तपासणीसाठी मुंबई येथील अन्न व औषध प्रशासनच्या कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहेत. या औषधांमधील घटक, त्यांचे प्रमाण, औषधांचा परिणाम यांची माहिती मागवण्यात येणार आहे. औषधांच्या माहितीसाठी एसआयटीने स्वतंत्र प्रश्नावली तयार केली असून, ही प्रश्नावली अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे. सनातनच्या विशेष साधकांना वीरेंद्र तावडे ही औषधे देत असल्याची चर्चा आहे. ही औषधे शरीरातील मज्जासंस्थेच्या कार्यावर परिणाम करत असल्याची शक्यता आहे.
दाभोलकर हत्येमागे ‘सनातन’चा तावडेच

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pansare murder case kolhapur police probe sanatan sanstha women followers