गेली पंधरा वर्षापासून परंडा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटेंना पराभवाचा धक्का बसला आहे. शिवसेना मंत्री तानाजी सावंत यांनी त्यांचा मोठया मताधिक्याने पराभव करत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उखडून टाकला. राष्ट्रवादी कांग्रेसचे राहुल मोटे शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये तानाजी सावंत यांनी आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले. शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी राहुल मोटेंचा ३२ हजार ७०२ मताधिक्याने पराभव करून नवा इतिहास रचला. शिवसेनेला येथे एवढया मोठया प्रमाणात यश प्रथमच मिळाले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे राहुल मोठे यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे परंडा मतदारसंघातील राजकिय समीकरण बदलण्याचे संकेत आहेत.

परंडा विधानसभेची मतमोजणी भुम शहरातील गोलेगाव पाटी जवळील शसकिय वस्तीग्रहात गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. मतमोजणी ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पहिल्या फेरीपासुन शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत यानी आघाडी घेतली ती शेवट च्या फेरी पर्यंत त्यांची आघाडी कायम होती. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी राहुल मोटे यांचा ३२ हजार ७०२ मतानी पराभव केला.

Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
maharashtra prantik tailik mahasabha , demands, check vijay wadettiwar caste certificate, prakash devtale, sudhir mungantiwar, pratibha dhanorkar, chandrapur lok sabha seat,
“विजय वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासा,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची मागणी; खोट्या स्वाक्षऱ्या करून काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा आरोप
NCP clock symbol
अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा
amravati lok sabha
राणा दाम्‍पत्‍याची चहूबाजूंनी कोंडी, महायुतीतून आव्‍हान, भाजपमधूनही विरोध

शिवसैनिकांनी सकाळपासून भुम-परंडा-वाशी शहरातील चौकाचौकात फटाके फोडुन गुलालाची उधळुन करीत जल्लोश केला. शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत यांना १ लाख ६ हजार ६ ७४ राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांना ७३ हजार ९७२ तर वंचित आघाडीचे सुरेश कांबळे यांना २७ हजार ८३७ मतावर समाधान मानावे लागले शिवसेनेचे प्रा सावंत हे ३२ हजार ७०२ मताधिक्यने विजयश्री खेचून आणला.