Parbhani ZP Election Winner List 2026: परभणीत भाजपाच्या माजी मंत्री सुरेश वरपूडकरांना मोठा धक्का बसला असून, त्यांनी घरातून उभ्या केलेल्या पाच पैकी चार उमेरवारांचा पराभव झाला आहे. वरपुडकरांचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला आहे. परभणीतील नागरिकांनी घराणेशाहीला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मंत्र्यांचा मुलगा, मुलगी, सून आणि एक पुतण्याचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
वरपुडकरांच्या घराणेशाहीला परभणीकरांनी नाकारले
वरपूडकरांची मुलगी सोनल देशमुख (मशाल चिन्ह) यांचा झरी जिल्हा परिषद गटातून पराभव झाला आहे. भाजपाच्या दिलीप देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. मुलगा समशेर वरपूडकर आणि सून प्रेरणा वरपुडकर (दैठणा) यांचाही पराभव झाला आहे. तर, एका पुतण्याचा पराभव झाला आहे. वरपूडकरांचा एक पुतण्या अजित वरपूडकर यांचा या निवडणुकीत विजयी झाला आहे.
परभणीत ५४ जिल्हा परिषदेच्या जागांसाठी २४७ उमेदवार रिंगणात आहेत. तर, १०८ पंचायत समिती गणांसाठी ४३३ उमेदवारांनी नशीब आजमावले. यावेळी जिल्ह्यात ७४.८९ टक्के मतदानांची नोंद झाली.
परभणी जिल्हा परिषदेच्या ५४ जागांचा असा आहे निकाल
भाजपा – २४, शिवसेना (शिंदेसेना) – ०५, राष्ट्रवादी – १५, उद्धव ठाकरे गट – ०६, शरद पवार गट – ००, काँग्रेस – ०३, इतर ०१ उमेदवार विजयी झाले आहेत.
परभणी जिल्हा परिषदेच्या ५४ गटातील विजयी उमेदवार
जिल्हा परिषदे गट – उमेदवार – राजकीय पक्ष
१) पेठशिवणी – सविता संतोष मुरकुटे – भाजपा</p>
२) बनवस – शांतीस्वरूप सुरेशराव जाधव – भाजपा
३) चाटोरी – अमित घनदाट – भाजपा
४) रावराजूर – मंगलाबाई रोकडे – शिवसेना उबाठा
५) शेळगाव – श्रीकांत विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस
६) उखळी बुद्रुक – माया मुजमुले- राष्ट्रवादी काँग्रेस
७) नरवाडी – विद्याताई धोंडगे – भाजपा
८) वझर – रोहिणी ज्ञानेश्वर वटाणे – भाजपा
९) वाघी धानोरा – रोहित नामदेव चव्हाण – भाजपा
१०) सावंगी म्हाळसा – लता विजयकुमार वाकळे – भाजपा
११) आडगांव बाजार – डॉ.देवराव गंगाराम क-हाळे -भाजपा
१२) भोगाव – कृष्णकांत शिवाजीराव मोरे – राष्ट्रवादी काँग्रेस
१३) धारासुर – शोभा कदम – भाजपा
१४) महातपुरी – कुशावर्ता संभाजी पोले – भाजपा
१५) गुंजेगाव -करुणाताई कुंडगीर – भाजपा
१६) कोद्री – पार्वतीबाई प्रल्हाद मुंडे – भाजपा
१७) राणी सावरगाव – सय्यद अल्ताफ सय्यद अकबर – भाजप
१८) मरडसगाव – शिल्पा रामराव पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस
१९) इसाद -सावित्रीबाई राजेश फड – शिवसेना
२०) ताडबोरगांव – वैशाली पंकज आंबेगावकर – राष्ट्रवादी काँग्रेस
२१) केकरजवळा – कौशल्याबाई तुकाराम शिंदे – शिवसेना
२२) रामपुरी – गीतांजली दत्तराव जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस
२३) कोल्हा -परमेश्वर पंढरीनाथ निर्वळ- भाजपा
२४) वरुड – संगीता राजेंद्र थिटे – भाजपा
२५)चारठाणा -सरुबाई शंकर जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस
२६) बोरी – दिपाली अजय चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस
२७) वस्सा – मनीषा अभिजीत पारवे – भाजपा
२८) कौसडी – माणिक शेषराव हरकळ – राष्ट्रवादी काँग्रेस
२९) लिंबा – रुक्मीनबाई पंडितराव भोसले – राष्ट्रवादी काँग्रेस
३०) बाभळगांव – वैजंताबाई अण्णासाहेब रणेर – राष्ट्रवादी काँग्रेस
३१) हादगांव बुद्रुक – अजिंक्य अनिलराव नखाते – राष्ट्रवादी काँग्रेस
३२) कासापुरी – अरुण ज्ञानेश्वर कोल्हे – राष्ट्रवादी काँग्रेस
३३) देवनांद्रा – सुमनबाई चक्रधर उगले – शिवसेना
३४) एरंडेश्वर – रितेश रावसाहेब काळे – शिवसेना उबाठा
३५) ताडकळस – केशरबाई गंगाधर जल्लारे – शिवसेना उबाठा
३६) वझुर – बेबीताई शिवाजी कुकर – शिवसेना उबाठा
३७) गौर – कोमल गंगाधर पारवे – राष्ट्रवादी काँग्रेस
३८) चुडावा – भरत मोहनलाल घनदाट – भाजप
३९) कावलगाव – अर्चना उत्तम ढगे – अपक्ष
४०) कुपटा – योगिता रणजीत मोरे – भाजपा
४१) वालूर – साक्षी नागेश साडेगांवकर – भाजपा
४२) देऊळगांव गात – प्रीती आशिष डख – भाजपा
४३) चिकलठाणा बुद्रुक – प्रसाद भगवानराव डासाळकर – भाजपा
४४) रवळगाव – डॉ. सविता संजय रोडगे – भाजपा
४५) सिंगणापूर – पांडुरंग बालासाहेब खिल्लारे – शिवसेना उबाठा
४६) झरी – दिलीप प्रभाकरराव देशमुख – भाजपा
४७) दैठणा – जोत्स्ना गणेशराव घाटगे – काँग्रेस
४८) पोखर्णी नृसिंह – ऐश्वर्या अजय चव्हाण – भाजपा
४९) लोहगांव – अजित अनिल वरपूडकर – काँग्रेस
५०) पेडगांव – जितेंद्र गोपाळ देशमुख – काँग्रेस
५१) पिंगळी – पूजा अनिल सावंत – शिवसेना
५२) टाकळी कुंभकर्ण – प्रतिक्षा प्रभूलाल जैस्वाल – शिवसेना उबाठा
५३) जांब – संग्राम प्रतापराव जामकर – राष्ट्रवादी काँग्रेस
५४) टाकळी बोबडे – सुचिता आनंदराव भरोसे – शिवसेना

