राहाता :  पुणे येथील आघारकर रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये पीएचडी करीत असलेल्या तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील परिमल लक्ष्मण विखे या तरुणाने गव्हातील जीन शोधून शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या संकरीत जातीच्या केलेल्या संशोधनास भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने २०२१ साठी अवसर कार्यक्रमाद्वारे देशातील संशोधन कार्य करीत असलेल्या संशोधकांकडून त्याबाबतचे पेपर्स मागविले होते व त्यासाठी पुरस्कार ठेवले होते. संशोधनासाठी तीन गट करण्यात आले होते. परिमल गेल्या पाच वर्षांपासून आघारकर इन्स्टिटय़ूटमध्ये गव्हावरील संशोधन करीत आहे. त्यासाठी त्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्तीही मिळत आहे. वेगवेगळय़ा शेतावर आणि प्रयोगशाळेत काम करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारे संशोधन केले आहे. गव्हाचे अनेक वाण बनवण्यात आले असले तरी खोलवर पेरणीमुळे उगवण कमी होणे, उगवण झाली तरी वाढ अधिक झाल्याने पीक जमीनदोस्त होऊन नुकसान होणे हे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्यास कारणीभूत ठरत असते.परिमल हे शेतकरी कुटुंबातील असल्याने लहानपणापासून ते आपल्या डोळय़ांनी हे बघत आलेले आहे.यातून त्यांचे झालेले अस्वस्थ मन त्यांना संशोधनाकडे घेऊन गेले.

mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
Changes in Composite Assessment Test Exam Schedule
संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा वेळापत्रकात बदल
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

त्यांनी गव्हातील वेगवेगळय़ा वाणाचे जीन शोधले.जमिनीत खोलवर पेरणी झाली तर बीज उगवण होणारे आणि संकर करून कमी वाढणारे नवीन वाणाचे संशोधन ते करीत असून त्यांचा प्रयत्न अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी त्यांना गेली पाच वर्षे खूप मेहनत करावी लागली आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने घेतलेल्या अवसर कार्यक्रमात परिमल यांनी आपला गव्हावरील संशोधन पेपर पाठवून सहभाग नोंदवला.विखे यांच्या संशोधन पेपरला दहा हजार रुपयांचा पुरस्कार व प्रमाणपत्र घोषित झाले आहे. पीएचडी कॅटेगरी मधून त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.त्यांच्या या संशोधनाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.गव्हाचे शाश्वत पीक घेताना कुठलेही नुकसान न होता भरपूर उत्पादन मिळण्यासाठी हे संशोधन महत्वाचे ठरणार आहे. परिमल हे लोणी बुद्रुक येथील शेतकरी लक्ष्मण मुरलीधर विखे यांचे पुत्र आहेत.