राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी विरोध केला आहे. ५ जुलैच्या दिवशी ठाकरे बंधू हे मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहेत. हे सरकारसाठी एक मोठं आव्हान असेल. याच मुद्द्यावरून भाजपचे नेते परिणय फुके यांनी ठाकरेंवर टीका केली. दोन्ही ठाकरे बंधुंची मुलं कोणत्या माध्यमातून शिकले आहेत असा प्रश्न परिणय फुके यांनी केला. मनोज जरांगे यांच्यावर परिणय फुकेंनी केली.

मनोज जरांगेंबाबत काय म्हणाले परिणय फुके?

“निवडणुका आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात. नंतर बिळात लपून बसतात. मराठ्यांचं आरक्षण वगैरे मनोज जरांगेंचा स्टंट आहे. त्यांना कोणत्याही मराठ्यांना न्याय द्यायचा नाही. त्यांना फक्त चर्चेत राहायचं आणि राजकारण करायचं आहे. मला वाटत नाही की मनोज जरांगेंना मराठा समाजात काही मान्यता आहे. मराठा समाजही जागृत झाला आहे. मराठा समाजाला माहीत आहे की भूलथापा कोण देतं आहे.” असं म्हणत परिणय फुकेंनी मनोज जरांगेंवर टीका केली.

निवडणुका जवळ आल्या की म मराठीचा की महापालिकेचा?

निवडणुका जवळ आल्या की मराठीचा म की महापालिकेचा म हे काही मला समजत नाही. माझा ठाकरे बंधूंना सवाल आहे की तुमची मुलं कुठल्या माध्यमातून शिकली आहेत. हिंदी, मराठी की इंग्रजी माध्यमांतून हे पण जरा सांगा. निवडणुका आल्या की मराठी प्रेम जागृत होतं. इतर वेळेला हे फक्त इंग्रजीवर प्रेम करतात. दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्रीची इंग्रजी पितात. त्यामुळे मला वाटतं की निवडणुकीच्या वेळेस यांचं मराठी प्रेम जागृत होतं. असं परिणय फुकेंनी खोचकपणे म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंना भाजपाच्या मांडीवर बसायचं आहे का?

उद्धव ठाकरेंना भाजपाच्या मांडीवर बसायचं आहे असंच दिसून येतं आहे. त्यांच्या मनातली इच्छाच आता समोर आलं आहे. दोन भाऊ एकत्र आले तरीही दोन्ही भावजया एकत्र आल्या पाहिजेत. ते दोघं एकत्र आले तरीही काही फरक पडणार नाही अशीही बोचरी टीका परिणय फुके यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज शासन निर्णयाची होळी

परिणय फुके यांनी केलेल्या टीकेला मनसे आणि ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात २९ जुलै रोजी मुंबईत शासानाच्या हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी काँग्रेस, कम्युनिस्ट तसेच इतर समविचारी पक्ष या आंदोलनात सहभागी झाले होते.