राज्यातील सिंचन व सहकार क्षेत्रात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशीची हमी देणा-या पक्षाशीच आघाडीचा विचार करू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार बठकीत केले. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याची रणनीती शेतकरी संघटनेची असून बारामती व माढय़ासह नऊ ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आपले उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सिंचन प्रकल्पामध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यामुळेच राज्यातील बहुसंख्य क्षेत्राला दुष्काळाचा सामना करावा लागतो, असे सांगून खा.शेट्टी म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारीतसुध्दा मोठय़ा प्रमाणात आíथक गरव्यवहार झाले आहेत. या गरव्यवहारामुळेच सहकारी साखर कारखाने आजारी पडले. त्यांच्या विक्री व्यवहारातही गफला झाला असल्याचा संशय आहे. या सर्व घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची हमी देणा-या राजकीय पक्षाबरोबरच आघाडी करण्याबाबत आम्ही विचार करू असे त्यांनी सांगितले.
ऊस उत्पादक शेतक-यांच्या आंदोलनावर सांगलीत गोळीबार झाला. या गोळीबारात वसगडे येथील शेतकरी चंद्रकांत नलवडे याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू पोलिसांच्या गोळीमुळेच झाल्याचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल असून तो दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खा. शेट्टी यांनी केला. या प्रकरणी दोषी असणा-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून ते म्हणाले की, या प्रकरणी कारवाई झाली नाही तर गृहमंत्री आर. आर. पाटील दोषी आहेत की काय असा संशय व्यक्त केला जाईल.
साखर कारखानदार आणि व्यापारी हे संगनमताने साखरेचे दर पाडत असून ही कृत्रिमता ऊस उत्पादकांच्या न्याय्य हक्कावर गदा आणणारी आहे. जाणूनबुजून साखर कारखानदार व व्यापारी ऊस उत्पादकांची फसवणूक करीत आहेत, शासनानेही वेळीच साखर खरेदी केली असती तर सध्याचा पेच निर्माण झाला नसता असेही त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना इचलकरंजी, माढा, बारामतीसह ९ ठिकाणी लोकसभेसाठी आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणाही खा. शेट्टी यांनी यावेळी केली. इचलकरंजीतून स्वत शेट्टी  मदानात उतरणार असून माढा लोकसभा मतदार संघातून सदाभाऊ खोत यांची उमेदवारी संघटनेमार्फत निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.