Patole criticizes state government after High Court verdict on Dussehra Mela rno news msr 87 | Loksatta

“सध्याचे नवे हिंदूहृदयसम्राट…”, दसरा मेळाव्याबाबत उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पटोलेंचा शिंदे गटाला टोला!

भाजपाचे अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात असल्याचंही म्हणाले आहेत.

“सध्याचे नवे हिंदूहृदयसम्राट…”, दसरा मेळाव्याबाबत उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पटोलेंचा शिंदे गटाला टोला!
काँग्रेस नेते नाना पटोले (संग्रहित फोटो)

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील नियोजित दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी नाकारणारा मुंबई महापालिकेचा निर्णय अयोग्य आणि कायदेशीर प्रक्रियेचा उघडउघड दुरुपयोग असल्याची टिप्पणी करीत उच्च न्यायालयाने शुक्रवारी तो रद्द केला आणि मेळावा घेण्याची परवानगी ठाकरे यांना दिली. यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी जल्लोष केला. तर, राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी न्यायालयाच्या या निणर्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला आहे. तसेच, भाजपाचे अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात असल्याचंही यावेळी पटोले यांनी सांगितलं. अकोला येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “राज्यातील सरकार हे स्वत:च कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे. विजयादशमीच्या दिवशी शिवाजीपार्कवर शिवसेनेचा दरवर्षी मेळावा होतो, जो बाळासाहेब ठाकरेंपासून होतोय. काँग्रेसच्या राजवटीत ते काँग्रेसवर टीका करायचे परंतु तरी जी परंपरा त्यांनी ठरवली, त्या परंपरेला काँग्रेस पाठिंबा दर्शवायचा. सध्या जे नवीन हिंदुहृदयमसम्राट झालेले आहेत तेच हिंदूंच्या व्यवस्थेला विरोधत करताना आपण पाहत आहोत.”

याचबरोबर “राज्यात कायदा, सुव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही पाहीलं असेल की या गटाचा एक आमदार गणेशोत्सवात मुंबईत स्वत: बंदुक चालवत होता. त्यावर गुन्हे दाखल झाले. बंदुकीच्या गोळ्या सापडल्या आहेत. अशापद्धतीने कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचा सरकारकडूनच प्रयत्न सुरू असेल, तर ही सगळ्या मोठी घातक व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. त्याचा प्रशासनाव ताण पडतोय. कारण, सरकारच कायदा, सुव्यवस्था बिघडवायला निघालं आहे. म्हणून अशा परिस्थिती काल जो न्यायालयाने दिला त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.” असं देखील पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-09-2022 at 14:48 IST
Next Story
…अन् महाराष्ट्रातील ‘या’ भाजपा आमदाराने निर्मला सीतारमन यांच्यासमोरच पत्नीला उचलून घेतलं; केंद्रीय अर्थमंत्री पाहतच राहिल्या