scorecardresearch

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन

… म्हणून राधानगरीचा अधिवास वाघासाठी पूरक झाल्याचे दिसून येत आहे

वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात आज(शनिवार) पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले. वन्यजीव निरीक्षण करिता दिलेल्या ट्रॅप निधीतून हा कॅमेरा खरेदी करण्यात आला होता. यापूर्वी २०१९ मध्ये एकदा वाघाचे छायाचित्रण झाले होते. परंतु त्यानंतर वाघाचे छायाचित्रण झाले नाही.

वनाचे संरक्षण, कुरण विकास, प्रशिक्षित आणि सतर्क वन कर्मचारी, वणव्याचे घटलेले प्रमाण या सर्व बाबींमुळे राधानगरीचा अधिवास वाघासाठी पूरक झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा नियोजन समितीमधून मोठ्या प्रमाणात ट्रॅप कॅमेरा करिता निधी मिळाल्यामुळे या वाघाचे अस्तित्व मिळाल्यामुळे वन्यजीव प्रेमी पालकमंत्री सतेज पाटील यांनी निधी मंजूर केला होता. तर, जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक अनिरुद्ध माने यांनी पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे ही बाब शक्य झाली, असे नमूद केले.

वाघाच्या अंगावर असलेले पट्टे हे विशिष्ट असतात व त्यामुळे वाघा- वाघांमधील फरक शास्त्रीय पद्धतीने ओळखता येतो. राधानगरीतील वाघाचे पट्टे हे कर्नाटक व गोवा या राज्यातील वाघांशी मिळतात का हे पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. जर ते मॅच झाले तर हा वाघ स्थलांतरित होऊन आलेला आहे, असे निष्कर्ष काढण्यात येतील. पट्टे जुळले झाले नाहीत तर या वाघाची उत्पत्ती राधानगरी अभयारण्यातच झाली असा निष्कर्ष काढण्यात येईल. तर, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांना अधिक सतर्क राहून जास्त निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Patteri tiger sightings at radhanagari sanctuary in kolhapur district msr

ताज्या बातम्या