पवन यादव ठरला महाराष्ट्रातील पहिला ट्रान्सजेंडर वकील; जाणून घ्या कसा होता प्रवास

मुंबईत राहणाऱ्या ट्रान्सजेंडर पवन यादवने नुकताच एलएलबीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन वकिलीच्या व्यवसायाला सुरूवात केली आहे. २६ वर्षांच्या पवन यांना महाराष्ट्रातल्या पहिल्या तर देशातल्या दुसऱ्या ट्रान्सजेंडर वकील म्हणून ओळखले जात आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला आपली ओळख लपवावी लागली आणि खूप संघर्ष करावा लागला आहे. सर्वसामान्य समाजाकडून नेहमीच सन्मान न मिळालेला तृतीयपंथी समाज प्रत्येक क्षेत्रात काम […]

Pawan Yadav became the first transgender lawyer in Maharashtra

मुंबईत राहणाऱ्या ट्रान्सजेंडर पवन यादवने नुकताच एलएलबीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन वकिलीच्या व्यवसायाला सुरूवात केली आहे. २६ वर्षांच्या पवन यांना महाराष्ट्रातल्या पहिल्या तर देशातल्या दुसऱ्या ट्रान्सजेंडर वकील म्हणून ओळखले जात आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला आपली ओळख लपवावी लागली आणि खूप संघर्ष करावा लागला आहे. सर्वसामान्य समाजाकडून नेहमीच सन्मान न मिळालेला तृतीयपंथी समाज प्रत्येक क्षेत्रात काम करू शकतो, असे पवनचे म्हणणे आहे.

ट्रान्सजेंडर असतानाच वकील होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, हे सर्व त्याच्या आई-वडिलांमुळे घडल्याचे पवन यांनी म्हटले आहे. बहुतेक असे दिसून येते की जर एखाद्या पालकाला आपला मुलगा जन्मतः तृतीयपंथी असल्याचे कळले तर ते त्याच्यावर प्रेम करणे थांबवतात, त्याचा तिरस्कार करतात, समाज त्याच्याकडे दुसऱ्या नजरेने पाहू लागतो. त्यानंतर अशी मुले समाजापासून दूर जातात आणि मग त्यांना तृतीयपंथी समाजाची मदत घ्यावी लागते.

पवन यांचा हा प्रवास तितकासा सोपा नसला तरी हे यश मिळवण्यासाठी त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. शाळेत प्रवेश घेण्यासाठीही पवनला ओळख लपवावी लागली होती. पण त्यांच्या मेहनतीला फळ आले आणि तो वकील झाला.

पवन यादव यांच्या म्हणण्यानुसार, किन्नर समाजातील लोक आज प्रत्येक क्षेत्रात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि असे लोक सतत त्यांच्या समाजात सामील होत आहेत जे तृतीयपंथींयाबद्दल लोकांची मते बदलण्याचे काम करत आहेत. त्यांना आशा आहे की एक दिवस असा येईल की जेव्हा किन्नर समाजातील लोकांना देखील चांगल्या नजरेने पाहिले जाईल, त्यांना तुच्छ लेखले जाणार नाही आणि त्यांना देखील समाजात स्थान मिळेल. हा सन्मान स्वत:साठी शासनाकडून मिळवून देण्याची लढाईही ते लढणार असून त्यांना हक्काचे ओळखपत्र मिळावे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करणार आहेत. सध्या वकील पवन यादव आता मुंबईतील दिंडोसी कोर्टात प्रॅक्टिस सुरू करणार असून लवकरच लोकांना न्याय देण्याचे काम सुरू करणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pawan yadav became the first transgender lawyer in maharashtra abn

Next Story
पुणेकरांनो सावधान! एका दिवसात पुण्यात आढळले १२५ ओमायक्रॉन बाधित
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी