येत्या काहीच दिवसांत राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे. विविध पक्षांकडून मोर्चेबांधणी, संघटन बांधणी, कार्यकर्ता मेळावा घेणे सुरू आहे. तळागाळापर्यंत पोहोचता यावं याकरता संघटना मजबूत केल्या जात आहेत. यंदाची निवडणूक इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी अटीतटीची राहणार आहे. तर, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जंगी लढत होणार आहे. याकरता सर्वच पक्ष कामाला लागलेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूर्त जय पवारही प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यावर्षी जुलै महिन्यात फूट पडली. अजित पवार आणि शरद पवार गट निर्माण झाले. या फुटीमुळे पवार कुटुंबियातही दोन गट पडले आहेत. कुटुंबातील काहीजण अजित पवार गटात तर काहीजण शरद पवार गटात आहेत. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवारांना समर्थन दिलं आहे. त्यामुळे आगामी काळात कुटुंबातील लोक प्रचार करतील की नाही माहिती नाही, याबाबत अजित पवारांनी शंका उपस्थित होती. या शंकेवर जय पवार यांनी प्रतक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> अजित पवारांना कुटुंबात एकटं पाडलं जातंय का?, रोहित पवार म्हणाले, “साहेबांनी बांधलेल्या घरातून…”

जय पवार म्हणाले, आजपासून प्रचाराचा दौरा सुरू झाला आहे. संपूर्ण बारामती फिरणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या लोकांना भेटायला आलो आहे.

यावेळी पत्रकारांनी त्यांना युगेंद्र पवार यांच्या भूमिकेबाबत विचारलं. तेव्हा जय पवार म्हणाले, “परिवारात प्रत्येकजण त्यांच्या पसंतीनुसार प्रचार करणार. दादांनी भाषणात सांगितलं की परिवारातील लोक त्यांचा प्रचार करणार नाही. त्यामुळे आपण इतरांना काही बोलू शकत नाही. आपण त्यांना संधी दिली पाहिजे. कारण आम्हालाही आमचा प्रचार आहे.”

युगेंद्र पवारांबाबत रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार म्हणाले, “बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मला कळलं की युगेंद्र बारामतीच्या ऑफिसला गेला होता. आजोबांना त्याने पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट. आपली संस्कृती हीच आहे की आपल्या वडिलधाऱ्यांबरोबर राहणं आपली जबाबदारी आहे. लहानपणापासूनच आपल्याला हे शिकवलेलं असतं. आपले वडील आणि आजोबांना वयस्कर झाल्यावर त्यांना बाहेर काढायचं हे आपल्या संस्कृतीत शिकवेललं नाही. युगेंद्रही त्याच विचाराने राहतोय हे पाहिल्यानंतर या नातवालासुद्धा (रोहित पवारांना) आवडलेलंच आहे. संस्कृती जपणं आपली जबाबदारी आहे. स्वतःचे हित जपण्यासाठी तुम्ही आपल्या काकांना, नेत्यांना सोडून जातायत ही आपली संस्कृती नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawar family will not promote ajit pawar jai pawar said everyone in the family rno news sgk
First published on: 22-02-2024 at 17:20 IST