वाई:हल्लीचा राजकीय सवंगपणा निथळ स्वरूपाचा आहे. व्यक्त होता येत नसलेले लोक फडतूस भाषेचा वापर करून समाजात संभ्रम निर्माण करत आहेत .अशा लोकांविषयी न बोललेलेच बरे असा टोला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनीत राणा यांना सातारा येथे लगावला
नीलम गोऱ्हे दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांच्या बरोबर त्यांनी बैठका घेतल्या.
नवनीत राणा यांच्या राजकीय उंची बद्दल मी न बोललेलेच बरे असे सांगुन नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कर्तुत्ववान मुख्यमंत्री आहेत .मात्र काही प्रवृत्ती सुपारी घेतल्या प्रमाणे बोलत असतात. नवनीत राणा यांच्या अनेक आरोपांत बद्दल काय सिद्ध व्हायचे राहिले आहे. त्यांचा राजकीय सवंगपणा उथळ स्वरूपाचा आहे. अशा फडतुस माणसांविषयी न बोललेले बरे असते असा टोला त्यांनी राणा यांना लगावला.
राज्यात भोंग्याचा विषय नाहक राजकीय वळणावर आणून ठेवण्यात आला आहे .बोलणाऱ्यांयचे नेते कोण आहेत हे महाराष्ट्राला ठाऊक आहे .भाजपचे दुसरे बोलणारे नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत किती प्रेस घेतल्या त्यांनी आरोप केल्यानंतर किती घोटाळे उघड केले .तर भाजपचे आणखी एक नेते रावसाहेब दानवे यांनी सेनेचे २२ आमदार माझ्या खिशात असल्याचा दावा केला होता .मात्र प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. त्यामुळे शिवसेनेला वेगवेगळ्या माध्यमातून सत्तेतून पायउतार करायचे भाजपचे प्रयत्न अपयशी होत असल्याने त्यांचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला.
ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारच्या या धोरणाला मारक असल्याचा भाजपच्या आरोपावर गोऱ्हे म्हणाल्या, ओबीसी आरक्षणाचे विधेयक देवेंद्र फडणवीस यांच्या काळात तयार करून ते सादर करण्यात आले होते .त्यांच्यामध्ये राजकीय मुद्देसूदपणे नसल्याने ते कोर्टात टिकले नाही. जे आपण करायचे आणि नाव दुसऱ्यावर घ्यायचे हे त्यांना शोभत नाही. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे संवैधानिक मुद्दे आहेत त्यावर विरोधकांनी कोणतेही आरोप केले तरी त्याला अर्थ प्राप्त होत नाही असा टोलाही गोऱ्हे यांनी विरोधकांना लगावला.
कोविडं मुळे जिल्ह्यातील २२०२ जणांचा मृत्यू झाला आहे त्या सर्वांना पन्नास हजारांची मदत मिळालेली आहे त्यातील ९८९ एक पालक असून पतीचे निधन झालेल्या साडे आठशे महिला आहेत. यातील शेतकरी महिलांना तीन एकर पर्यंत बियाणे व खते मोफत द्यावी अशी सूचना केली आहे.मृत्यू झालेल्यांच्या मालमत्ता हस्तांतराचा प्रश्नही निकाली काढण्यासाठी ग्रामपंचायत पालिका व महापालिकांना सूचना केल्या असल्याचे सांगून सातारा जिल्ह्याला कोविडं अंतर्गत ७० कोटींची मदत दिल्याचे त्यांनी सांगितले .