केशकर्तनालये, ब्यूटीपार्लर रविवारपासून सुरू; पण पाळावे लागणार ‘हे’ नियम

सरकारनं जाहीर केली नियमावली

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केशकर्तनालये, ब्युटीपार्लर, स्पा, व्यायामशाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या व्यवसायातील लोकांची उपासमार होत असून ही दुकाने पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी राज्यभरातून होत होती. केशकर्तनालय मालक- चालक संघटनेच्या प्रतिनिधींच्या भावना मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या. आत्महत्या घडल्या आहेत, लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना सशर्त परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर गुरूवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी येत्या आठवड्यात केशकर्तनालये सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार रविवारपासून केशकर्तनालये, ब्यूटीपार्लर सुरू करण्यात येणार असून यासाठी नवी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.

केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग अशाच मर्यादित सेवा ग्राहकांना देता येणार आहेत. त्वचेशी संबंधित इतर कोणत्याही सेवा (उदा. दाढी) देण्यास परवानगी असणार नाही. दुकानदारांना ठळकपणे ही बाबा प्रदर्शित करावी लागणार आहे. याव्यतिरिक्त दुकानदारांना दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रन आणि मास्कचा वापर करणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा अन्य वस्तूंचं सॅनिटायझेशन करणं बंधनकारक असणार आहे. दुकानातील वापरला जाणारा प्रत्येक भागही दर दोन तासंनी सॅनिटाईझ करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा वापर बंधनकारक असणार आहे. तसंच ज्या वस्तू लगेच नष्ट करणं शक्य नाही त्या वस्तू सेवा दिल्यानंतर सॅनिटाईझही कराव्या लागणार आहे. या सर्व अटींचे दुकानदारांना पालन करावं लागणार आहे.


दोन दिवसांत आणखी निर्णय..

जीम, ब्यूटीपार्लर सुरू करण्यास परवानगी द्यावी, असा आग्रह काही मंत्र्यांनी धरला होता. व्यायामशाळा, जीम बाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप झालेला नसला तरी येत्या दोन दिवसांत त्याबाबतही निर्णय होईल, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Permission for opening salon mmr region new rules maharashtra government jud

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या