मुलगा होण्यासाठी पत्नीशी ठेवले विकृत पद्धतीने शरीरसंबध; तक्रार दाखल

विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

rape-sexual-abuse-759
प्रातिनिधिक छायाचित्र (indian express)

सोलापूर : मुलगा व्हावा म्हणून सासूच्या सांगण्यावरून पती ठराविक दिवशीच शारीरिक संबंध ठेवत होता. अंधश्रध्देपोटी सासूने पती-पत्नीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी वेळापत्रक बनवून दिले होते. मात्र, पती विकृत पद्धतीने शारीरिक संबध ठेवत असल्यामुळे पीडितेला त्रास सहन होत नव्हता. त्यामुळे पीडित विवाहितेने पती व सासूसह सासरा, दोन नणंद, पतीचा आत्येभाऊ यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पतीने वारंवार विकृत पद्धतीने शरीरसंबध ठेवल्याने त्यातून शारीरिक इजा झाल्याचेही पीडित विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. विवाह झाल्यानंतर वर्षभर पतीने असह्य छळ केल्यामुळे तब्येत खालावली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी आपणांस माहेरी आणून सोडले आणि नंतर पतीचा दुसरा विवाह लावून देण्यासाठी घटस्फोट मागत आहेत, असेही पीडित विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Perverted sexual intercourse with wife to have a child solapur srk

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना