Petrol & Diesel Price : आज ३ ऑक्टोबर २०२४ रोजी महिन्याचा तिसरा दिवस आहे. पेट्रोल, डिझेलचे आजचे नवीन दर जाहीर झाले आहेत. तेल विपणन कंपन्या देशात दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात व ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात; जेणेकरून घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या शहरांत पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol & Diesel Price )काय असेल हे त्यांना समजू शकेल.तर आज कोणत्या शहरांत किती आहे इंधनाचा भाव खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या.

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol & Diesel Price) :

Petrol Diesel Price Changes
Petrol Diesel Price Changes : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण? वाचा किती रुपयांनी कमी झाला इंधनाचा दर
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Traffic changes in Baner Road area due to Metro works  Pune
मेट्रोच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल
Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
shocking video
VIDEO : पेट्रोल भरल्यानंतर ग्राहकाने ५०० रुपये दिले नाही, पुढे कर्मचाऱ्याने असे काही केले… व्हिडीओ होतोय व्हायरल
Petrol and diesel price On 24th October
Daily Fuel Rates : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! चेक करा तुमच्या शहरांतील आजचा भाव काय असणार?
The price of petrol Diesel In Marathi
Petrol and Diesel Rates : महाराष्ट्रात किती रुपयांनी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरांतील आजचा भाव
BYD offers discounts on Electric Vehicles
BYD Seal offers : ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर तीन वर्षांची सर्व्हिस, मेन्टेनन्स पॅकेज फ्री! वाचा सिंगल चार्जिंगमध्ये किती देते रेंज
शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.४९९१.०१
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.३६९१.८७
औरंगाबाद१०४.९३९१.४३
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०४.४३९०.९५
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.०४९०.६१
धुळे१०४.१०९०.६४
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०४.३४९०.८७
जालना१०५.८३९२.३९
कोल्हापूर१०५.३६९१.८७
लातूर१०५.१६९२.६७
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.६४९१.१२
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०३.८६९०.३७
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.५३९१.०४
रायगड१०५.०३९१.५०
रत्नागिरी१०५.५७९२.०४
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.६८९१.२१
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.६९९१.२२
ठाणे१०३.६९९०.२०
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.३७९१.८८

तुम्ही तक्त्यात पाहिलं असेल की, पुण्यात पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत (Petrol & Diesel Price ) वाढ झालेली दिसते आहे. पेट्रोल-डिझेलचे दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात. कारण – तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ करत असतात. तर आजचे दर पाहता काही ठिकाणी पेट्रोलचे दर किंचित कमी तर काही ठिकाणी किंचित दरवाढ पाहायला मिळाली आहे.

हेही वाचा…Citroen C3 : फ्रंट फॉग लॅम्प, सहा एअरबॅग्ज; देशात फॅमिली SUV दाखल; किंमत नऊ लाखांपासून सुरू…

एसएसएमद्वारे पाहता येणार आता दर :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…

तुमच्या कार, बाईकला रंग बदलण्याआधी वाचा हा नियम :

तुमच्या गाडीचा रंग तुमच्या मनाप्रमाणे बदलणे कायदेशीररीत्या चुकीचे नाही; पण असे करण्यासाठी तुम्हाला काही कायदेशीर प्रक्रियांचे पालन करावे लागते. कारण- वाहनाच्या आरसी बुकमध्ये तुमच्या वाहनाचा रंग नमूद केलेला असतो. अशा वेळी तुम्हाला वाहन कायद्याच्या कलम ५२ अंतर्गत वाहनाचा रंग बदलण्याची प्रक्रिया पार पडावी लागते. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या गाडीचा रंग बदलणार असाल, तर तुम्हाला त्याबाबत आरटीओला कळवावे लागेल आणि गाडीचा रंग बदलण्याचा तपशील आरसी बुकमध्ये द्यावा लागेल.