Petrol-Diesel Price in Maharashtra: सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे वेगेवेगळ्या कंपन्या देखील ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्सच्या गाड्या बाजारात उपलब्ध करून देतात. अशातच या दुचाकी, चारचाकीमध्ये काही इलेक्ट्रिक गाड्यांचा सुद्धा समावेश आहे. पण, आजही काही ग्राहक पेट्रोल व डिझेलच्या वाहने चालवण्यात पसंती दाखवतात. त्यामुळे सर्व सामन्यांचं लक्ष रोजच्या पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीकडे असते. तर आज नेहमीप्रमाणे पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील इतर शहरांत काय सुरु आहे पेट्रोल व डिझेलचा भाव चला तर जाणून घेऊ या… महाराष्ट्रातील पेट्रोल- डिझेलचे (Petrol & Diesel ) नवे दर : शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०४.४४९०.९६अकोला१०४.१६९०.७२अमरावती१०४.७४९१.२८औरंगाबाद१०५.२६९१.७५भंडारा१०५.०२९१.५५बीड१०४.४३९०.९५बुलढाणा१०५.३२९१.८४चंद्रपूर१०४.४६९१.०२धुळे१०४.४५९०.९८गडचिरोली१०४.९४९१.४८गोंदिया१०५.४४९१.९५हिंगोली१०५.१०९१.६३जळगाव१०५.१४९१.६४जालना१०५.६३९२.१०कोल्हापूर१०४.६७९१.२१लातूर१०५.३६९१.८६मुंबई शहर१०३.४४८९.९७नागपूर१०३.९९९०.५५नांदेड१०६.१३९२.६२नंदुरबार१०४.७५९१.२७नाशिक१०४.३४९०.८६उस्मानाबाद१०५.१२९१.६३पालघर१०३.६९९०.२०परभणी१०५.९४९२.४२पुणे१०४.५३९१.०४रायगड१०४.७८९१.२६रत्नागिरी१०५.६१९२.११सांगली१०४.४२९०.९७सातारा१०४.७०९१.२३सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१सोलापूर१०४.८३९१.३६ठाणे१०४.३१९०.८०वर्धा१०४.७४९१.२८वाशिम१०४.६८९०.८०यवतमाळ१०५.२२९१.७३ महाराष्ट्रातील अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, ठाणे या शहरांत पेट्रोलची दरवाढ पाहायला मिळाली आहे. तर अकोला, बीड, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, सातारा या शहरांत पेट्रोलच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. तर अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद, पुणे, रायगड, रत्नागिरी या शहरांत डिझेलच्या किंमतीत किंचित दरवाढ तर अकोला बीड, बुलढाणा, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, उस्मानाबाद, पुणे, रत्नागिरी, रायगड आदी शहरात डिझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. पेट्रोल व पॉवर पेट्रोलमधला फरक काय ? (Petrol Vs Power Petrol) वाहनामध्ये पेट्रोल भरण्यासाठी आपणही कमी अधिक दिवसांच्या फरकाने पेट्रोल पंपाकडे फेरी मारत असाल. या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारचे पेट्रोल पाहायला मिळतात, एक म्हणजे नॉर्मल पेट्रोल आणि दुसरं म्हणजे पॉवर पेट्रोल. या दोघांचे भावही वेगवेगळे असतात. पॉवर पेट्रोल हे प्रीमियम इंधन आहे आणि त्यामध्ये नेहमीच्या पेट्रोलपेक्षा जास्त ऑक्टेन रेटिंग असते. सामान्य पेट्रोलचे ऑक्टेन रेटिंग सुमारे ८७ पर्यंत असते तर पॉवर पेट्रोलमध्ये ९१ ते ९४ पर्यंत असते. नेहमीच्या पेट्रोलपेक्षा पॉवर पेट्रोल अधिक महाग होण्याचे कारण म्हणजे त्याच्या उत्पादनाचा खर्च जास्त असतो. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात आणि त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवला जातात.