Petrol Diesel Rate in Marathi: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधी दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आज २४ ऑगस्टचे पेट्रोल आणि डिझेल दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाला. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात. जाणून घ्या आज दरात कसा बदल झाला…
देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या…
© IE Online Media Services (P) Ltd