Petrol Diesel Rate in Marathi: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधी दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आज १४ ऑगस्टचे पेट्रोल आणि डिझेल दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाला. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात. जाणून घ्या आज दरात कसा बदल झाला… देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या… महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०४.०२९०.५६अकोला१०४.०५९०.६२अमरावती१०४.१०९१.६३औरंगाबाद१०५.१२९१.६२भंडारा१०४.९३९१.४६बीड१०५.८२९२.३०बुलढाणा१०४.७३९१.२७चंद्रपूर१०४.४४९१.००धुळे१०४.७६९१.२७गडचिरोली१०५.१८९१.७१गोंदिया१०५.४७९१.९८हिंगोली१०४.९९९१.५१जळगाव१०४.५६९२.०४जालना१०५.७४९२.२१कोल्हापूर१०४.३८९०.९३लातूर१०५.२९९१.८०मुंबई शहर१०३.४४८९.९७नागपूर१०४.३७९०.९२नांदेड१०६.२४९२.७१नंदुरबार१०५.००९१.५१नाशिक१०४.६८९१.१९उस्मानाबाद१०५.२८९१.७९पालघर१०३.८६९०.३७परभणी१०७.३९९३.७९पुणे१०३.९५९०.४८रायगड१०३.८९९०.४०रत्नागिरी१०५.५२९०.१४सांगली१०४.४३९०.९८सातारा१०४.९१९१.५६सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१सोलापूर१०४.१२९०.६७ठाणे१०३.६२९०.१८वर्धा१०४.४९९१.३५वाशिम१०४.८७९१.४०यवतमाळ१०५.३७९१.८८ तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात. एसएमएसद्वारे जाणून घ्या दर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.