अमरावती : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झालेल्या दंगल प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचा जिल्हाध्यक्ष सोहेल अन्वर याला अमरावती पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरी गेट पोलीसांनी सोहेलला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त विक्रम साळी हे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले असून नागपूर पोलीस ठाणे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोहेल हा कोणाच्या संपर्कात होता, याचा तपास केला जात आहे.

सोहेल अन्वरच्या छाया नगर येथील घराची झडती घेतली जात आहे. औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का? याचा तपास देखील केला जात आहे. पोलीसांनी अद्याप या व्यक्तीला का ताब्यात घेतले आहे, हे अद्याप स्पष्ट केले नाही. दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक देखील नागपुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. सोहेल अन्वरची माहिती एनआयएचे पथक देखील घेत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pfi activist arrested umesh kolhe murder case ysh
First published on: 06-07-2022 at 16:37 IST