Placarding in support of Karnataka in Jat taluka of Sangli | Loksatta

‘महाराष्ट्र सरकार आम्हाला कोणतीच सुविधा देत नाही’; सांगलीतील जत तालुक्यात कर्नाटक समर्थनार्थ फलकबाजी

महाराष्ट्र सरकार म्हैसाळ योजनेचे पाणी देणार, असे गेल्या ४ दशकापासून वारंवार आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, अद्याप पाणी प्रश्न सुटला नसल्यामुळे ग्रामस्थांनी हा मार्ग निवडला.

‘महाराष्ट्र सरकार आम्हाला कोणतीच सुविधा देत नाही’; सांगलीतील जत तालुक्यात कर्नाटक समर्थनार्थ फलकबाजी
सांगलीतील जत तालुक्यात कर्नाटक समर्थनार्थ फलकबाजी

पाणी प्रश्नाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत तालुक्यात कर्नाटक समर्थनार्थ फलकबाजी व मोर्चे काढण्यात येत आहेत. तिकोंडी येथे शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे अभिनंदन करणारा फलक वेशीवर लावण्यात आला. रविवारी सकाळी उमराणी येथे सर्वपक्षीय बैठकीत सहा महिन्यात पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

हेही वाचा- राज्यपालांना हटवण्याच्या मागणीवरून राऊतांची सरकारवर टीका,’ सुधीर मुनगंटीवार म्हणाले “अल्टिमेटम देण्याचा…”

तिकोंडी येथे काही ग्रामस्थ कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहे, असे सांगत फलक घेऊन फेरी काढण्यात आली. आम्ही कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहेत असेही ग्रामस्थ म्हणत आहे. गावातील वेशीवरच्या स्वागत कमानीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मईं यांचा फोटो असलेला फलक लावण्यात आला होता. काही काळानंतर हा फलक काढून टाकण्यात आला.

हेही वाचा- हातकणंगलेमध्ये चार मोठ्या घराण्यांतील तरुण नेतृत्वाची चाचपणी

महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत कर्नाटक सरकार वेगवेगळ्या सोई – सुविधा व अनुदान देत आहे. तर महाराष्ट्र सरकार म्हैसाळ योजनेचे पाणी देणार, असे गेल्या ४ दशकापासून वारंवार आश्वासन देत आहेत. याच मुद्द्यावर निवडणूक लढवल्या आहेत. तसेच पाणी देण्याचे गाजर दाखवत आहे. आम्हाला महाराष्ट्र कोणतीही सुविधा देत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

हेही वाचा- “असे आक्रित इंग्रज काळातही घडले नाही, काळ मोठा…”, संजय राऊतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; पंतप्रधानांचाही केला उल्लेख!

गावातील कमानीवर बोम्मईंचे छायाचित्र असलेला व कन्नड भाषेत आभार मानण्यात आल्याचा फलक लावण्यात आल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करून फलक ताब्यात घेतला. दरम्यान उमराणी येथेही रविवारी सकाळी सर्वपक्षिय बैठक झाली. या बैठकीत राज्य शासनाला निर्वाणीचा इषारा देण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 12:52 IST
Next Story
राज्यपालांना हटवण्याच्या मागणीवरून राऊतांची सरकारवर टीका,’ सुधीर मुनगंटीवार म्हणाले “अल्टिमेटम देण्याचा…”