PM Narendra Modi On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रात प्रचारासाठी दिल्लीतील दिग्गज नेते देखील विविध मतदारसंघात सभा घेत आहेत. या सभांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपूरच्या चिमुरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचा दावा केला. तसेच कलम ३७० बद्दल भाष्य करत जनतेने आशीर्वाद दिल्यामुळे ३७० कलम कायमचं जमिनीत गाडलं, असंही म्हणाले. तसेच महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी आहे, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“भाजपा महायुती आहे तर राज्याची प्रगती आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला देखील माहिती आहे. या निवडणुकीनंतरही राज्यात भाजपा महायुतीचं सरकार स्थापन होईल असा विश्वास आहे. आज महाराष्ट्र भाजपाला मी शुभेच्छा देतो. कारण एवढ्या चांगल्या पद्धतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये लाडक्या बहि‍णींसाठी, युवकांसाठी आणि विकासासाठी एकापेक्षा एक असे अनेक चांगले संकल्प करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार म्हणजे दुप्पट वेगाने विकास. आज महाराष्ट्र असं राज्य आहे की त्या राज्यात सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्रात अनेक विमानतळं निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात जवळपास १२ वंदे भारत ट्रेन सुरु आहेत”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : “मराठा मतं बोटांवर मोजण्याइतकी…”, व्हिडीओ व्हायरल होताच बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण

“महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्प बंद पडले. महाविकास आघाडीने कधीही विकासाची कामे होऊ दिले नाही. आघाडीच्या नेत्यांनी फक्त कामं बंद पाडण्याचे प्रयत्न केले. खरं तर विकासाचे कामे बंद पाडण्यात विरोधी काँग्रेसची पीएचडी झाली आहे. महाराष्ट्रातील वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गासह अनेक मोठमोठ्या प्रकल्पांना रोखण्याचं काम आघाडीने केलं हे लक्षात ठेवा. महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी आहेत. अशा महाविकास आघाडीला दुसऱ्यांदा लूट करण्यासाठी संधी देऊ नका”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

“आता जम्मू कश्मीरमध्ये काय झालं? हे तुम्ही देखील पाहिलं. अनेक वर्ष दहशतवादाच्या घटना घडत होत्या. यामध्ये अनेक जवान शहीद झाले. मात्र, जम्मू कश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याला काँग्रेसचा विरोध होता. पण आम्ही कलम ३७० रद्द करण्याचं काम केलं. जवळपास सात दशकं या देशात दोन संविधान होते. ते म्हणजे एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान. या संविधानाचं आपण सर्वजण पालन करतो. तसेच दुसरं म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये होतं. जम्मू काश्मीरमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधिश आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री हे आपल्या संविधानानुसार पदाची शपथ घेत नव्हते. त्याचं कारण ३७० कलमाची अडचण होती. मात्र, तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला आणि ३७० कलम कायमचं जमिनीत गाडलं”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

Story img Loader