scorecardresearch

Pariksha Pe Charcha: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद; ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर नागपुरातून फडणवीसांचीही ऑनलाईन ‘हजेरी’!

मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नागपुरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी!

pm narendra modi pariksha pe charcha
पंतप्रधानांच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती (फोटो – एएनआय)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालक आणि शिक्षकही उपस्थित होते. दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी परीक्षांचा ताण आणि त्यावर कशी मात करता येऊ शकेल, विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत, त्यावर काय उपाय आहेत यासंदर्भात चर्चा करतात. यावेळीही मोदींनी याचप्रकारे विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’साठी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते.

नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधला. यावेळी देशभरातीली विविध भागातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. त्याचप्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

ठाण्यातून शिंदे तर नागपुरातून देवेंद्र फडणवीस!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती लावली. ठाण्यात ज्या शाळेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिक्षण घेतलं, त्या शाळेतच मुख्यमंत्री परीक्षा पे चर्चासाठी उपस्थित होते. दुसरीकडे नागपुरातून देवेंद्र फडणवीस हा कार्यक्रम ऐकत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 12:17 IST
ताज्या बातम्या