PM Modi to Visit Maharashtra Today : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे आले आहेत. आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

मंगळवारी मुंबई भेटीत पंतप्रधान दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान हे मुंबईत दाखल होतील. दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मोदी हे उपस्थित राहतील. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव
Live Updates

Narendra modi Maharashtra Visit Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

19:32 (IST) 14 Jun 2022
“मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे, पण मी…”; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले होते. राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे तसेच जल भूषण या नवीन इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे २०० वर्षांपासून सातत्याने प्रकाशित होत असलेल्या ‘मुंबई समाचार’च्या ‘द्विशताब्दी महोत्सवा’मध्ये सहभागी झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे असे म्हटले आहे. वाचा सविस्तर....

18:41 (IST) 14 Jun 2022
मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवास पंतप्रधान मोदींची उपस्थिती

पंतप्रधान मोदींच्या उपस्थिती मुंबई समाचारचा द्विशताब्दी महोत्सव बीकेसी येथे होत आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आहे.

18:39 (IST) 14 Jun 2022
“महाराष्ट्रातील अनेक शहरे देशाच्या विकासाची केंद्रे बनणार”; राजभवनातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले होते. राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे तसेच जल भूषण या नवीन इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. वाचा सविस्तर...

18:09 (IST) 14 Jun 2022
पंतप्रधान मोदींचं गिरगाव चौपाटीवर स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आले असून, गिरगाव चौपाटीवर भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे.

17:56 (IST) 14 Jun 2022
क्रांती गाथा दालनाचे उदघाटन हा एक योगायोगच नाही तर एक चांगला मुहूर्त आहे - मुख्यमंत्री

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उद्घाटन हा एक योगायोगच नाही तर एक  चांगला मुहूर्त आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. वाचा सविस्तर बातमी...

17:13 (IST) 14 Jun 2022
 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

 देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांना समर्पित 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राजभवन येथे झाले.  या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.

16:34 (IST) 14 Jun 2022
अजित पवार यांचे भाषण नाकारणे, हा महाराष्ट्राचा अपमान - सुप्रिया सुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देहू येथे संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. वाचा सविस्तर...

16:30 (IST) 14 Jun 2022
पंतप्रधान मोदी यांचे मुंबईत आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी मुंबई येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. आयएनएस शिक्रा येथे आगमनाप्रसंगी त्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

15:47 (IST) 14 Jun 2022
नरेंद्र मोदींनी घेतले तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत तुकाराम महाराजांना अशा प्रकारे नमन केले. तसेच यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांची पूजा केली.

15:32 (IST) 14 Jun 2022
या वर्षी सर्व संकल्प पूर्ण करण्याचे देशाचे लक्ष्य- नरेंद्र मोदी

पूर्ण देशात प्रसाद योजनेंतर्गत तीर्थस्थळे आणि पर्यटनस्थळाचा विकास केला जात आहे. भगवान राम यांच्याशी निगडित जे स्थळं आहेत त्यांचा रामायण सर्किटच्या रुपात विकास केला जातोय. या आठ वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांचा विकास झाला आहे. आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेले महू असेल किंवा लंडमधील त्यांच्या घराचे स्मारकात रुपांतर मुंबईतील चैत्यभूमीचे काम, नागपूरमधील दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित करण्याचे काम असो किंवा दिल्लीमधील महापरिनीर्वाण झालेल्या ठिकाणी मेमोरियलचे निर्माण असेल हे पंचतीर्थ नव्या पिढीला बाबासाहेबांची ओळख करुन देत आहेत. संत तुकाराम म्हणायचे की योग्य दिशेने सर्वांचे प्रयत्न असतील तर अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवता येते. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त देशाने आपले संकल्प शंभर टक्के पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.

15:22 (IST) 14 Jun 2022
शिवाजी महाराजांच्या जीवनात तुकाराम महाराजांनी महत्त्वाची भूमिका बजावली - मोदी

संत भिन्न परिस्थितीत समजाला गती देण्यासाठी पुढे येतात. शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या जीवनात तुकाराम महाराजांसारख्या संतानी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकांना शिक्षा झाली. तेव्हा ते तुरुंगात तुकाराम महाराजांचे अभंग गात असत. वेगवेगळा कालखंड वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. मात्र या सर्वांसाठी संत तुकाराम यांची वाणी आणि उर्जा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. आता आषाढामध्ये पंढरपूरची यात्रा सुरु होणार आहे. चारधाम यात्र असो, अमरनाथ यात्र असो या यात्रा आपल्यासाठी एक उर्जास्त्रोत आहेत. याच यात्रांच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेला जिवंत ठेवलेलं आहे. विविधता असताना भारत हजारो वर्षांपासून एका राष्ट्राच्या रुपात उजूनही उभा आहे. आपल्या राष्ट्रीय एकतेला मजबूत करण्यासाठी आपेल काही कर्तव्य आहे. आपण आपली प्रचीन ओळख आणि परंपरा यांना चैतन्यपूर्ण ठेवलं पाहिजे.

15:15 (IST) 14 Jun 2022
पंढरपूरची वारी ही संधीच्या समानतेचं प्रतिक- मोदी

आज देश सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्रावर चालतो आहे. सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ कोणताही भेदभाव न करता सर्वांनाच मिळतोय. देशात महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केला जातोय. पंढरपूरची वारी ही संधीच्या समानतेचं प्रतिक आहे. संत तुकाराम महाराज म्हणायचे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणेज समजात शेवटी बसलेल्या व्यक्तीला आपले समजून त्यांचे कल्याण करणे हेच संताचे लक्ष्य आहे. हाच देशासाठी संकल्प आहे. हाच संकल्प घेऊन देश पुढे जातोय. दलित, आदिवासी, मजूर यांचे कल्याण करणे ही प्राथमिकता आहे.

15:11 (IST) 14 Jun 2022
तुकाराम महाराजांचा उपदेश राष्ट्रभक्ती, समाजभक्तीसाठी महत्त्वाचा- मोदी

आज येथे संत चोखामेळा तसेच त्यांच्या परिवाराने रचलेल्या सार्थ अभंग गाथेचे प्रकाशन करण्याचे मला सौभाग्य लाभले. या सार्थ अभंग गाथेमध्ये संत परिवाराच्या ५०० पेक्षा जास्त अभंग रचनांना सोप्या भाषेत अर्थासहित सांगण्यात आले आहेत. संत तुकाराम सांगायचे की समाजात उच्च नीचतेचा भेदभाव करणे हे पाप आहे. त्यांचा हा उपदेश भक्तीसाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच हा उपदेश राष्ट्रभक्ती तसेच समाजभक्तीसाठी महत्त्वाचा आहे.

15:06 (IST) 14 Jun 2022
संत तुकाराम महाराजांचे अभंग उर्जा देतात- मोदी

संत तुकाराम महाराज यांच्यातील दया, करुणा तसेच सेवा त्यांच्या अभंगांच्या रुपात आजही आपल्यासोबत आहे. या अभंगांनी आपल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. ज्याचा भंग होत नाही. जो वेळेनुसार शास्वत आणि प्रासंगिक असतो तोच अभंग असतो. आज देश सांस्कृतिक मूल्यांवर पुढे जात आहे. यावेळी संत तुकाराम यांचे अभंग आपल्याला उर्जा देत आहेत. मार्ग दाखवत आहेत. संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज, संत सेना महाराज, संत गोरोबाकाका, संत चोखामेळा यांच्या अभंगांमधून आपल्याला नव्याने प्रेरणा मिळते.

15:00 (IST) 14 Jun 2022
भारत जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे- मोदी

देश आपल्या स्वातंत्र्यांचा अमृतमोहत्सव साजरा करत आहे. आपण जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहोत. याचे श्रेय भारत देशातील संत परंपरा तसेच ऋषींना आहे. भारत ही संतांची भूमी असल्यामुळे हा देश शास्वत आहे. प्रत्येक युगामध्ये आपल्याकडे देश तसेच समाजाला दिशा देण्यासाठी कोणीतरी महान व्यक्ती आलेला आहे. आज देश संत कबीरदास यांची जयंती साजरी करतोय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे हे ७२५ वे वर्ष आहे. या महान व्यक्तींनी आपल्या शास्वततेला सुरक्षित केलं. भारताला गतीशील ठेवलं.

14:55 (IST) 14 Jun 2022
तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले- मोदी

आज संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले. ज्या शिळेवर तुकाराम महाराजांनी १३ दिवसांपर्यंत तपश्चर्या केली ती शिळा त्यांच्या वैराग्याची साक्षीदार झालेली आहे. मी ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा आधार असल्याचे मानतो. देहू येथील शिळामंदिर फक्त भक्तीच्या शक्तीचे केंद्र नसून त्यामळे भारताचे सांस्कृतिक भविष्य प्रशस्त होणार आहे. या पवित्र स्थानाचे पुन:निर्माण केल्यामुळे मंदिर समितीचे मी आभार व्यक्त करतो.

14:51 (IST) 14 Jun 2022
देहूच्या सर्व नागरिकांना आदरपूर्वक नमन - मोदी

देहूच्या या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो. येथील प्रत्येकजण भक्तीने ओतप्रोत संताचं रुप आहे. याच करणामुळे मी देहूच्या सर्व नागरिकांना आदरपूर्वक नमन करतो. मागील काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य लागभले होते. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे.या पूर्ण कामात ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासठी ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

14:46 (IST) 14 Jun 2022
मी भगवान विठ्ठल आणि वाकऱ्यांना वंदन करतो- पंतप्रधान मोदी

नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. भगवान विठ्ठल आणि वाकऱ्यांना मी वंदन करतो. आज देहूच्या या पवित्र भूमिवर येण्याचं सौभाग्य लाभलं. हे स्थळ तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमीदेखील आहे.

14:40 (IST) 14 Jun 2022
तुकाराम महाराजांच्या शब्दांनी जनतेला व्यापून घेतलं- फडणवीस

ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला पण कळस झाले तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांनी सश्रद्ध आणि अंधश्रद्धेपासून दूर राहणारा समाज निर्माण केला. त्यांच्या शब्दांमध्ये एवढी ताकद होती की ते कोणी मिटवू शकलं नाही. तुकाराम महाराजांच्या शब्दांनी जनतेला व्यापून घेतलं.

14:38 (IST) 14 Jun 2022
मी मागच्या जन्मात काही पुण्याई केली असेल- देवेंद्र फडणवीस

नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी देवेंद्र फडणवीस सभेला संबोधित करत आहेत. हा सोहळा आपल्यासाठी आनंदाचा आहे. संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी मोदी आले आहेत. त्याचे मी स्वागत करतो. उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज उपस्थित आहेत. मी मागच्या जन्मात मी काही पुण्याई केली असेल. कारण या मंदिराच्या लोकार्पणासाठी मोदींसोबत मला उपस्थित राहता आले,

14:32 (IST) 14 Jun 2022
मोदींचे तुकोबांची पगडी, उपरणे आणि तुळशीची माळ देऊन स्वागत

नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल होताच त्यांचा तुकोबांची पगडी, उपरणे आणि तुळशीची माळ घालून नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती देण्यात आली.

14:30 (IST) 14 Jun 2022
देहूला भेट देणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान

नरेंद्र मोदी हे पुण्याती देहू संस्थानला भेट देणारे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरल आहेत.

14:25 (IST) 14 Jun 2022
मोदींनी प्रभू श्रीराम यांचे घेतले दर्शन

नरेंद मोदी यांनी संत तुकाराम महाराजांसोबतच ते विठ्ठल-रुक्मीनी यांच्यासमोर नतमस्तक झाले. त्यानंतर मोदी यांनी प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतले.

14:22 (IST) 14 Jun 2022
नरेंद्र मोदी यांनी घेतले संत तुकाराम महाराजांचे दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांची ओळख असणारी विशेष पकगडी डोक्यावर घातली होती.

14:18 (IST) 14 Jun 2022
मोदींच्यात ताफ्यासमोर पुष्पवृष्टी

मोदींचा ताफा सभास्थळाकडे जात असताना स्थानिक नागरिकांनी मोदींच्या ताफ्यासमोर पुष्पवृष्टी केली आहे. काही क्षणात मोदी सभास्थळी पोहोचणार असून ते येथे जमलेल्या वारकऱ्यांना तसेच समुदायाला ते संबोधित करणार आहेत.

14:16 (IST) 14 Jun 2022
मोदींचा ताफा सभास्थळाकडे रवाना

नरेंद्र मोदी यांनी तुकाराम महराजांच्या मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर आता मोदींचा ताफा सभास्थळाकडे रवाना झाला आहे. काही क्षणात ते सभास्थळी पोहोचणार आहेत.

14:13 (IST) 14 Jun 2022
नरेंद्र मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत तुकाराम महाराजंच्या गाथेचे दर्शन घेतले. तसेच संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण केले आहे.

13:50 (IST) 14 Jun 2022
मोदींचा ताफा संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या दिशेने रवाना

नरेंद्र मोदी यांचा ताफा संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराकाडे निघाला आहे. काही क्षणात ते मंदिर परिसरात पोहोचणार आहेत.

13:49 (IST) 14 Jun 2022
काही क्षणात संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण होणार

नरेंद्र मोदी काही क्षणात संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. हा लोकार्पण सोहळा साधारण वीस मिनिटे चालणार आहे. त्यानंतर मोदी येथे जमलेल्या वारकऱ्यांना तसेच इतर मंडळींना संबोधित करतील.

13:45 (IST) 14 Jun 2022
मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर कोण कोण उपस्थित होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन झाले त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख तसेच इतर नेते उपस्थित होते.

13:43 (IST) 14 Jun 2022
नरेंद्र मोदी येताच वारकऱ्यांचा जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरचे देहूमध्ये आगन होताच येथे एकच जल्लोष करण्यात आला. मोदी आता हेलिकॉप्टमधून उतरून तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे जात आहेत.

13:42 (IST) 14 Jun 2022
मोदी देहूमध्ये दाखल, काही क्षणात तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये दाखल झाले आहेत. ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करतील. २० मिनिटांच्या या लोकार्पण सोहळ्यानंतर ते सभेला संबोधित करणार आहेत. येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

13:34 (IST) 14 Jun 2022
मोदी हेलिकॉप्टरने देहूकडे रवाना

नरेंद्र मोदी पुण्यात पोहोचले आहेत. आता ते हेलिकॉप्टरने देहूकडे रवाना झाले आहेत. येथे ते संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराचे लोकार्पण करतील.

13:32 (IST) 14 Jun 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूकडे रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोहगाव विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले. सध्या मोदी देहूकडे रवाना झाले आहेत.

13:13 (IST) 14 Jun 2022
मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर देवेंद्र फडणवीस उपस्थित

नरेंद्र मोदी यांचे काही क्षणात विमानतळावर आगमन होणार आहे. त्यामुळे मोदींच्या स्वागतासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विमानतळवर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत शहराध्यक्ष जगदीश मुळीक हेदेखील आहेत. प्रशासकीय क्षेत्रातील विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे अधिकारीदेखील येथे उपस्थित आहेत.

13:10 (IST) 14 Jun 2022
मोदींच्या स्वागतासाठी अजित पवार उपस्थित

नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली असून येथे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील विमानतळावर दाखल झाले आहेत.

13:08 (IST) 14 Jun 2022
कल्याण गायकवाड यांनी सादर केला तुकाराम महाराजांचा अभंग

'मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे हा संत तुकाराम महाराजांचा अभंग कल्याण गायकवाड यांनी सादर केला आहे.

13:05 (IST) 14 Jun 2022
काळे कपडे परिधान केलेल्या भाविकांना सभास्थळी प्रवेश नाही

मोदींच्या प्रत्येक सभेत जशी काळ्या कपड्यांवर बंदी असते तशाच पद्धतीने आजच्या सभेतदेखील काळे कपडे, मास्क, कुठल्याही प्रकारचा काळा कपडा गेटवरच काढून घेण्यात येत आहे. तर काळे कपडे परिधान करून आलेल्यांना सभा स्थळी प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्याचबरोबर चावी, पाण्याची बाटली, कुठल्याही प्रकारची पिशवी घेऊन जाण्यास मनाई आहे.

13:04 (IST) 14 Jun 2022
सभेला उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांना व्हीआयपी पास

सुरक्षेच्या कारणास्तव या सभेला उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांना व्हीआयपी पास देण्यात आले आहेत. याशिवाय कडक तपासणी करूनच वारकऱ्यांना सभास्थळी सोडण्यात येत आहेत.

12:57 (IST) 14 Jun 2022
नरेंद्र मोदी संत तुकाराम मंदिर परिसरात १.४५ वाजता दाखल होणार

पंतप्रधान मोदी हे दोन तास देहू परिसरात असणार आहेत. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळावरून देहूकडे ते प्रयाण करतील. एक वाजून ४५ मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील. या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा २० मिनिटांचा लोकार्पण सोहळा होईल. दोन वाजून १० मिनिटांनी ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. या ठिकाणी ५० मिनिटांची सभा होणार असून सभामंडपात वारकरी आणि भाविकांशी ते संवाद साधणार आहेत.

12:55 (IST) 14 Jun 2022
दहा हजारपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती

भाविकांसाठी अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गायिका कार्तिकी गायकवाडने 'विधनुमय जग वैष्णवांचा धर्म' तर कौस्तुभ गायकवाड याने 'अवघे गरजे पंढरपूर' हा अभंग सादर केला. मुख्य मंडपात आणि दोन उपमंडपात मिळून सुमारे दहा हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी आहे. पुरुष वारकरी पेहरावात दिसत असून त्यांच्या डोक्यावर गांधी टोपी, भगवी टोपी आणि भगवे फेटे लावलेले आहेत.

12:51 (IST) 14 Jun 2022
देहूकरांची साडेदहा वाजल्यापासून सभास्थानाकडे धाव

कार्यक्रम दोन वाजता सुरू होणार असला तरी देहूकरांनी साडेदहा वाजल्यापासून सभास्थानाकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी भाविकांना थांबवले आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाह नागरिकांनो दोन किलोमीटरचे अंतर पार केले आहे.

12:36 (IST) 14 Jun 2022
आज मोदी-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येत असून राजभवनमधील कार्यक्रमात मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका व्यासपीठावर  उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी हे मंगळवारी मुंबईत दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान मुंबईत दाखल होतील.

12:30 (IST) 14 Jun 2022
पुणे, मुंबई शहरात चोख सुरक्षा व्यवस्था

मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पुणे तसेच मुंबई येथे सुरक्षा व्यावस्था वाढवण्यात आली आहे. मोदी देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.

12:29 (IST) 14 Jun 2022
पंतप्रधान मोदी पुणे, मुंबई येथे कार्यक्रमांना हजेरी लावणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते पुणे तसेच मुंबई येथील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान हे मुंबईत दाखल होतील. दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होईल.

modi pune visit

मोदी यांच्या पुणे भेटीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.