scorecardresearch

पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ

पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ झाली आहे.

पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ
संग्रहित

पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी न्यायालयाने संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यापूर्वी ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे.

हेही वाचा – गणपती आगमन सोहळ्याला मुंबईत गालबोट; मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न, स्थानिकांनी पोलीस स्थानकाला घेरलं अन्…

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे?

पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या ६७२ कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी २००८ मध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. मात्र म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला ४१४ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली. मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही. मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे. गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pmla court extends sanjay raut judicial custody in patrachawl money laundering case till 5 september spb

ताज्या बातम्या