जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे २ महिलांकडून कोट्यवधी रुपये किमतीची ब्राउन शुगर ड्रग्ज (Brown sugar drugs) विशेष पोलीस पथकाने जप्त केली. शनिवारी (18 डिसेंबर) सकाळी १० वाजल्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ही कारवाई करण्यात आली. फैजपूर येथील पोलीस उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी २ महिलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत असलेला अमली पदार्थ म्हणून ब्राउन शुगर ओळखला जातो. रावेरमध्ये २ संशयित महिला ब्राउन शुगर घेऊन काही व्यक्तींशी व्यवहार करणार असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती.

पोलिसांकडून सापळा रचत कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने रावेरमध्ये सापळा रचला. सकाळी दहाच्या सुमारास पोलीस पथकाने हा व्यवहार होण्यापूर्वीच संशयित महिलांना ब्राऊन शुगरसह ताब्यात घेतले.

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, रावेर येथील पोलीस निरीक्षक कैलास नागरे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, विनोद पाटील यांच्यासह शासकीय पंच रावेरमध्ये दाखल झाले होते. ब्राउन शुगरची तपासणी करण्यात आली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.

हेही वाचा : मुंबई एनसीबी पथकाची नांदेडमध्ये मोठी कारवाई, ११२७ किलो गांजा जप्त, विशाखापट्टणम ‘कनेक्शन’

दरम्यान, जिल्ह्यातील गांजा प्रकरण, गावठी कट्टे प्रकरणानंतर आता ब्राउन शुगर प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police action on brown sugar drugs in raver jalgaon arrest 2 women pbs
First published on: 18-12-2021 at 20:40 IST