गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांवर ड्रोनची नजर

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा काही तासांवर येऊन ठेपला आहे. काही अनुश्चित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी- चिंचवड पोलिस देखील सज्ज झाले आहेत. दोन्ही पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी चार हजारहून अधिक पोलिस बंदोबस्त असणार आहे. देहूत आणि आळंदीत लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल होत असतात. गर्दीचा फायदा घेऊन अनेक चोरटे सोनसाखळी, पाकीट मारतात त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी चार ड्रोन असणार आहेत. अशी माहिती पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त यांनी आज (शुक्रवारी) परिसराचा आढावा घेतला. पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने वारकरी आळंदीत आणि देहूत दाखल होत असतात. या आषाढी सोहळ्याच्या दरम्यान चोरटे फायदा घेऊन सोनसाखळी हिसकावणे, मोबाईल हिसकावणे, पाकीट मारणे असे प्रकार घडतात. याच्यावरती पायबंध आणण्यासाठी अँटिक चैन स्नॅचिंग आणि चोर शोधक बारा पथके तैनात करण्यात आली आहेत. चोरट्यावर ड्रोनची नजर देखील असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrangement for the palanquin departure of tukoba and mauli kjp 91 amy
First published on: 09-06-2023 at 20:27 IST