scorecardresearch

Premium

कराडमधील ४६ लाखांच्या दरोड्याच्या गुन्ह्यात दोघे जेरबंद

पोलीस रात्रीचा दिवस करुन दरोडेखोरांच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी कसून केलेल्या तपासाला यश आले.

arrest
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

कराड :  कराड शहरातील शिंदे मळ्यात डॉ. राजेश शिंदे यांच्या बंगल्यावर गेल्या सहा दिवसांपूर्वी पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये पोलीसांनी दोघांना जेरबंद केले. तर, या टोळीतील दरोडेखोरांचा शोध जारी असून, तेही लवकरच गजाआड होतील. त्यातून आणखी काही गुन्ह्यांची उकल होईल असा पोलिसांचा अंदाज आहे. डॉ. राजेश शिंदे हे आपल्या पत्नी पूजा व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने बारा डबरी परिसरात होलीस्टींग हिलिंग सेंटर चालवतात. इथेच त्यांचा बंगला आहे. या बंगल्यावर रविवारी उत्तर रात्री सशस्त्र टोळीने दरोडा टाकला होता.

हेही वाचा >>> “काहीही झालं तरी राष्ट्रवादीचा पालकमंत्री होऊ देणार नाही”, शिंदे गटातील नेत्याचा थेट विरोध

Accused absconding for 36 years was caught
खुनाच्या गुन्ह्यामध्ये तब्बल ३६ वर्षे फरार आरोपीस पकडले; पोलिसांची कराडजवळ कारवाई
Ganpati Visarjan 2023
पुढच्या वर्षी लवकर या..! लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप
pankaja munde (5)
पंकजा मुंडे यांची चहूबाजूने कोंडी, कारखान्यावर कारवाई; पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी डावलल्याने खदखद
sheep killed wolf attack
सांगली : लांडग्यांच्या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार, २० गायब

या दरोड्यात डॉ.शिंदे  व त्यांच्या वृध्द आई, सासू तसेच पत्नी, मुले, बहीण अशा कुटुंबीयांना चाकू व सुऱ्यांचा धाक दाखवून सुमारे ४८ तोळे सोन्याचे दागिने व २७ लाखांची रोख रक्कम असा तब्बल ४६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. यानंतर ही टोळी मोटारकारने पाटणबाजूने पुढे मुंबईकडे गेल्याची माहिती समोर आली. पण चार – पाच दिवस उलटलेतरी गुन्हेगार हाती लागत नसल्याने पोलिसांवर टीका होत होती. या तपासाचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. 

हेही वाचा >>> “अजित पवार गट नक्की अपात्र होणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचं थेट विधान

दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिसांची पाच पथके विविध ठिकाणी धाडण्यात आली होती. पोलीस रात्रीचा दिवस करुन दरोडेखोरांच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी कसून केलेल्या तपासाला यश आले. या गुन्ह्यात अंबरनाथ येथे सापळा रचून एकाला पकडले गेले. कुलदीपसिंग असे त्याचे नाव आहे. दरम्यान, आणखी एकाला ताब्यात घेतल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. पण त्याचे नाव समजू शकले नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police arrested two in robbery of 46 lakhs in karad zws

First published on: 15-07-2023 at 23:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×