अकोल्याजवळ वाहतूक पोलिसाला ट्रेलरने चिरडले

नितीन निखार हे पोलीस कर्मचारी जागीच मृत्युमुखी पडले

मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वाहतूक पोलिसाला ट्रेलरने मंगळवारी सकाळी चिरडले. यामध्ये नितीन निखार हे पोलीस कर्मचारी जागीच मृत्युमुखी पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, निखार हे महामार्गावर वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांनी वेगाने येणाऱ्या ट्रेलरला हात दाखवून थांबण्याची सूचना केली. पण ट्रेलर चालकाने ट्रेलर थेट निखार यांच्या अंगावरच चढविल्याने ते जागीच मृत्युमुखी पडले. यानंतर इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले. बाळापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा पूर्ण करण्यात येत आहे. ट्रेलर चालकाकडे पोलीस चौकशी करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Police constable dead in an accident near akola