वाई : हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी सातारा आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवातीला सोळा आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

हरिहरेश्वर सहकारी बँकेत ३७ कोटी ४६ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार झाला. संबंधितांनी संगनमताने बँकेच्या पैशाचा अपहार केला आहे. आरोपींनी स्वत:ची अस्तित्वात नसलेली मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून आपले नोकर – चाकर, मित्रमंडळी, संबंधित यांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे करून बँकेच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप दोषारोप पत्रात करण्यात आला आहे. बँकेच्या घोटाळय़ाप्रकरणी बँकेच्या विशेष लेखापरीक्षकांनी २९ जणांवर ठपका ठेवला आहे. याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ठोस तपास करून सहा नव्याने आरोपी निष्पन्न केले तर आठ आरोपींना अटक केली होती. यापैकी बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर, त्यांचे बंधू रमेश खामकर, अर्जुन खामकर, बँकेचे व्यवस्थापक रमेश जाधव याशिवाय बँकेला सर्च व मूल्यांकन करून देणारे वकील व इंजिनियर यांनाही अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सहा आरोपी मयत आहेत. ज्या आरोपींकडून तपास पूर्ण झाला अशा आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  अजूनही काही लोकांना ताब्यात घ्यायचे असून त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा शोधण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!
complaint filed against me in cbi ed by using sim card and aadhaar card chhatrapati sambhajinagar police commissioner manoj lohiya
“आपल्याविरुद्ध सीबीआय, ईडी, ठाण्यात तक्रार दाखल” बनावट फोन, लिंक पाठवण्याचे प्रकार निदर्शनास, पोलीस आयुक्तांची माहिती

या गुन्ह्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने वीस हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. या  गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलिस अधिकारी मोहन शिंदे करत आहेत. त्यांना विक्रम कणसे, अजित पवार, संजय मोरे, शफिक शेख, संकेत माने आदींनी मदत केली. याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्याने ठेवीदारांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. आरोपींची मालमत्ता जप्तीची कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केली आहे.