खळबळजनक! वर्ध्याच्या कदम हॉस्पिटलमध्ये आढळल्या ११ अर्भकांच्या कवट्या

वर्धा जिल्ह्यात आर्वीच्या कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडं आढळल्याने एकच खळबळ उडालीय.

वर्धा जिल्ह्यात आर्वीच्या कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडं आढळल्याने एकच खळबळ उडालीय. पोलिसांनी एका खड्ड्यात सापडलेली ही अर्भकांची हाडं आणि कवट्या पुढील तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवली आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर सखोल चौकशी करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी आरोपी डॉ. रेखा कदमला अटक केली आहे. तसेच डॉ. कदम यांच्या सासूलाही ताब्यात घेतलं आहे.

४ दिवसांपूर्वी आर्वीतील डॉ. रेखा कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी पोलीस तक्रार झाल्यावर हा बेकायदेशीर गर्भपात ३० हजार रूपये घेऊन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत डॉक्टरसह तिघांना अटक केली. बुधवारी (१२ जानेवारी) पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात तपासणी केली. यावेळी रूग्णालयाच्या परिसरात एका खड्डयात ११ कवटया आणि ५२ हाडे आढळून आली. पोलिसांनी हे अवशेष ताब्यात घेऊन नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

कवटया आणि हाडे नेमके कुणाचे आहेत?

कवटया आणि हाडे नेमके कुणाचे आहेत याबद्दल पोलीस तपास करत आहेत. अटकेत असलेल्या डॉ. रेखा कदम यांचीही कसून चौकशी सुरू आहे. या हॉस्पिटलला अधिकृत गर्भपात व गर्भनिदान केंद्राचा दर्जा आहे. मात्र, मृत अर्भकाची विल्हेवाट लावण्याची वैद्यकीय पध्दत असते. ती या दवाखान्यात पाळली की नाही याबाबत पोलीस साशंक आहेत.

हेही वाचा : वर्ध्यात लॉकडाउनमुळे शेतकरी आणि बारा बलुतेदार अडचणीत; सवलत देण्याची भाजपाची मागणी

आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साळूंके म्हणाले की सापडलेल्या अवशेषाबाबत आताच निश्चित काही सांगता येणार नाही. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच ठोस निष्कर्ष काढता येईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police found 11 skulls and 52 bones in kadam hospital arvi wardha pbs

Next Story
मराठी पाट्यांच्या निर्णयामधील ‘त्या’ मुद्द्यावरुन राज ठाकरे संतापले; म्हणाले, “याची काय गरज?, पुन्हा आठवण…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी