scorecardresearch

बनावट खात्यातील १३ लाख रुपये गोठवले

संशयास्पद व्यवहारामुळे खाते गोठवण्यात आले असून यामागील खरा चेहरा लवकरच उघडकीस आणला जाईल असे पोलीसांनी सांगितले.

money
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

सांगली : मुंबई क्राईम ब्रॅंचमधून अधिकारी बोलत असल्याचे सांगून महिला डॉक्टरला लाखाचा गंडा घालण्याचा प्रयत्न सायबर पोलीसांनी रविवारी उधळला. सांगलीतील डॉ. सोनिका मिरापूरम यांना मुंबईतून वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगणारा दूरध्वनी आला. तुमचे पार्सल जप्त करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दंडापोटी ९८ हजार ३२६ रु. बॅंक खात्यावर ऑनलाईन जमा करण्यास सांगितले.

महिलेनेही घाबरुन पैसे वर्ग केले. दरम्यान संशय आल्याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. उपनिरीक्षक रोहिदास पवार व सहकाऱ्यांनी तांत्रिक तपास केला असता सदरची रक्कम येस बॅंकेतील खात्यावर वर्ग झाल्याचे दिसून आले. याबाबत बॅंकेशी संपर्क साधून ही फसवणूकीतील रक्कम असल्याचा पत्रव्यवहार करण्यात आला. अधिक चौकशीत या खात्यावर १३ लाख २९ हजार रुपये जमा असल्याचे आढळले. संशयास्पद व्यवहारामुळे खाते गोठवण्यात आले असून यामागील खरा चेहरा लवकरच उघडकीस आणला जाईल असे पोलीसांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 20:05 IST