scorecardresearch

Premium

छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज

परवानगी न घेता मोर्चा काढण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Lathi charge in Sambhaji Nagar
इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चावर लाठीमार

छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या आदर्श नगरी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात निघालेल्या ठेवीदारांच्या मोर्चावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची घटना घडली आहे. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात निघालेल्या ठेवीदारांच्या मोर्चावर लाठीमाराची ही घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या गेटवर घडली.

नेमकं काय घडलं?

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदर्श पतसंस्था ठेवीदारांनी मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी अडवला आहे. हा मोर्चा विना परवागनगी काढण्यात आला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सरकारने ठेवीदारांचे पैसे परत करावेत, आम्हाला मंत्र्यांना भेटू द्यावे अशी मागणी खासदार जलील यांनी केली. मात्र या मोर्चावर सौम्य लाठीमार केल्याची घटना घडली आहे.

minister girish mahajan slams opposition over dcm ajit pawar s absence from cabinet meeting
कराड : अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत विरोधकांकडून त्यांच्या सोयीचे अर्थ; मंत्री गिरीश महाजन यांचा टोला
Golden Man
‘गोल्डन मॅन’साठी मुंबईकर एकवटले, पोलिसांच्या दमदाटीविरोधात थेट नडले; स्ट्रीट आर्टिस्टने VIDEOद्वारे सांगितलं वास्तव
sanjay raut uddhav thackrey
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा दोषमुक्तीसाठी अर्ज
narayan rane talk maratha reservation
९६ कुळी मराठय़ांची कुणबी दाखल्यांची मागणीच नाही!; नारायण राणेंचा दावा, जरांगेंच्या मागणीला छेद

पोलिसांनी मोर्चाला सुरुवातीला स्पीकरवरुन काही सूचना दिल्या. मात्र मोर्चा सुरु होता. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठकीला सुरूवात झाली असून मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारतर्फे मोठे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडत आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police lathicharge on march led by imtiaz jaleel in chhatrapati sambhajinagar scj

First published on: 16-09-2023 at 14:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×