आरग (ता. मिरज) येथे उसाच्या शेतात  करण्यात आलेली गांजा शेती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उघडकीस आणून सव्वा तीन लाखाचा ३२ किलो ओला गांजा जप्त केला. या प्रकरणी राजू हारगे या संशयिताला पोलीसांनी अटक केली आहे.

आरग गावी नरवाड रस्त्यावर असलेल्या शेतात उसाच्या फडामध्ये गांजा लागवड करण्यात आली असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे अधिक्षक बसवराज तेली, अप्पर अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या आदेशाने निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल येळेकर, हवालदर संजय कांबळे, संकेत मगदूम, संदीप पाटील, सागर लवटे, प्रतिक्षा गुरव, विमल नंदगावे आदींच्या पथकाने शेतात  छापा टाकला असता पाच ते आठ फूट उंचीची गांजाची  १४ झाडे मिळाली. या गांजाचे वजन केले असता ते ३२ किलो ३६५ ग्रॅमआढळून आले. याची किंमत ३ लाख २३ हजार ६५० रूपये होते.

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
mukhtar ansari death gangster turned politician buried near his parents graves in ghazipur
मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे दफन
Nagpur, Gold Prices, Dip, Ahead of Holi, Offering Relieve, Buyers,
खुशखबर ! होळीच्या तोंडावर सोन्याचे दर घसरले.. असे आहेत आजचे दर…

या प्रकरणी शेताचा मालक राजू हारगे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.