गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसे विक्रीस घेऊन जाणाऱ्यास अटक

काडतूस घेवून जळगाव येथे विक्रीसाठी जात होता.

pistol, पिस्तुल , Police, Crime, pistol , bullets , Dhule, Maharashtra, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
संग्रहित छायाचित्र

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत राज्य परिहवन महामंडळाच्या बसमधून जळगावकडे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसे विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या एक प्रवाशाला फागणे ता.धुळे, शिवारात रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ९० हजार २०० रूपये किंमतीच्या ४ पिस्तुले व ६ काडतूसे जप्त करण्यात आले. शिरपूर येथून एकजण बसने जळगाव येथे गावठी पिस्तूल व काडतूस विक्रीसाठी जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने फागणे ता.धुळे, गावाच्या शिवारात सापळा रचला. राज्य परिवहन महामंडळाची धुळे – जळगाव बस फागणे येथे पोहचली असता पोलिसांनी इशारा दिल्यानंतर चालकाने बस थांबवली. पथकाने बसमध्ये बसलेल्या संशयितास शोधून त्याच्याकडील सामानाची तपासणी केली. यावेळी त्याचाकडे ही हत्यारे सापडली. यावेळी पथकाने मुद्देमालासह त्याला ताब्यात घेतले व गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले.

या ठिकाणी वरिष्ठ अधिका-यांनी त्याची कसून चौकशी केली. दामु सखाराम सोनवणे (वय ४२, रा. आमोदे ता. शिरपूर) असे त्याचे नाव आहे. संशयित सोनवणे हा पिस्तूल व काडतूस घेवून जळगाव येथे विक्रीसाठी जात होता. जळगावमध्ये तो कोणास या पिस्तूल विक्री करण्यासाठी जात होता, याबाबत तपास केला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांनी दिली. या कारवाईमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण व कर्मचारी यांचा सहभाग होता. याप्रकरणी पोलिस कर्मचारी आरीफ उस्मान शेख यांच्या फिर्यादीवरुन सोनवणे यांच्याविरुध्द आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Police sized pistol and bullets in dhule