वाई तील गुळुंब येथे चित्रीकरण स्थळी दमबाजी करणाऱ्या नऊ जणांवर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चित्रीकरण स्थळी जाऊन दमबाजी करणाऱ्या नऊ जणांवर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

संग्रहित छायाचित्र

वाई

तालुक्यातील गुळुंब येथे “मुलगी झाली हो” या मालिकेचे चित्रकरण सुरु आहे. चित्रीकरण स्थळी जाऊन दमबाजी करणाऱ्या नऊ जणांवर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. “मुलगी झाली हो” या मालिकेच्या सेटवर  “संभाजी ब्रिगेड” चे कार्यकर्ते सांगणारे लोक पोहोचले. किरण मानेंना न्याय द्या अन्यथा चालते व्हा अशी मागणी आंदोलकांनी केली.

   हा वाद कंपनी आणि सदर कलाकार यांच्या मधील आहे. याबाबत गुळूंब  गावचा व सेट वरील कलाकार यांचा या घटनेशी  काही संबंध नाही .यावेळी सेट वरील व्यवस्थापकांनी त्यांना समजावून सांगण्यात आले. यानंतर त्यांनी वाद वाढविल्यावर भुईंज पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अनिल बाळकृष्ण जाधव, प्रदीप भानुदास कणसे, आनंदराव बापूराव बर्गे, लहू शंकर सावंत, कृष्णा मारुती शेलार, अवधूत शंकर जाधव, निलेश धोंडिबा जगदाळे, प्रकाश वसंत पावशे, नरेश दिलीप काटे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून याचा तपास भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे हे करत आहेत. मुलगी झाली हो चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सांगणाऱ्या नऊ कार्यकर्त्यांना घेतल ताब्यात असून त्यांना रात्री अटक केल्याची माहिती मिळाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police station files case nine persons ysh

Next Story
रत्नागिरीत राष्ट्रवादीला लाभ, सिंधुदुर्गात राणेंवर अंकुश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी