सांगली : म्हैसाळ येथील ९ जणांच्या हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या सोलापूरच्या मांत्रिकाच्या घरझडतीमध्ये एक डोळ्याचा नारळ, पांढर्‍या कवड्या, धागा बांधलेला नारळ संशयित दोन आरोपीविरूध्द महाराष्ट्र अंधश्रध्दा अधिनियम ३ नुसार कारवाईमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार बैठकीत सांगितले. यावेळी अप्पर अधिक्षक मनिषा दुबुले, उप अधिक्षक अशोक विरकर उपस्थित होते.

म्हैसाळ येथे वनमोरे कुटुंबातील ९ जणांची हत्या केल्या प्रकरणी सोलापूरचा मांत्रिक अब्बास बागवान व धीरज सुरवसे या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता धयकादायक माहिती समोर आली आहे. १९ जून रोजी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला असून त्या दिवशी संशयितांनी डॉ.माणिक वनमोरे याच्या घरी जेवण केले. गुप्तधन मिळविण्यासाठी १ हजार १०० गहू सात वेळा मोजण्यास सांगण्यात आले. बाटलीत काळ्या गोळ्याची पूड करून विषारी द्रावणाच्या नउ बाटल्या तयार केल्या. यानंतर पोपट वनमोरे याच्या घरी जाउन तिघांना स्वतंत्रपणे बोलावून बाटलीतील द्रव पिण्यास सांगून शांतपणे व स्वतंत्रपणे झोपण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा डॉ. वनमोरे याच्या घरी येऊन याच पध्दतीने उर्वरित सहा जणांना विष पाजले.

Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
accident on Jat- Kavthemahankal road 5 dead and 5 serious injured
जत- कवठेमहांकाळ मार्गावर अपघात; ५ ठार, ५ गंभीर
What Ajit Pawar Said?
“द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?”, मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार काय बोलून गेले?
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन

दरम्यान, मांत्रिक बागवान हा बहिणीच्या घरी गेला.त्याठिकाणी झडती घेतली असता एक डोळ्याचा नारळ, धागा बांधलेला नारळ, पांढर्‍या कवड्या, पोपट वनमोरे याचे दोन कोरे धनादेश आणि मृतांजवळ सापडलेल्या सावकारांची नावे असलेल्या चिठ्ठीच्या दोन छायांकित प्रती आढळल्या आहेत. बागवान आणि वनमोरे यांचा गेल्या चार वर्षापासून संपर्क असल्याची माहितीही तपासात पुढे आली असून गुप्तधनासाठी देण्यात आलेल्या रकमेची वारंवार मागणी होउ लागल्यानेच हे हत्याकांड घडले असावे असे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होते.

गुप्तधनासाठी वनमोरे कुटुंबाकडून किती रक्कम देण्यात आले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मांत्रिक बागवान याच्या बहिणीच्या नावे पंजाब नॅशनल बँकेच्या खात्याद्बारे पैसे वर्ग करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले असून बहिण मात्र फरार झाली आहे. या घटनेमध्ये आणखी काही जणांचा समावेश असण्याची शययताही अधिक्षक गेडाम यांनी व्यक्त केली. हा प्रकार गुप्तधनासाठी काळी जादू करण्याचा असल्याचे काही घटक आढळून आल्याने महाराष्ट्र अंधश्रध्दा अधिनियम ३ प्रमाणे कलम वाढविण्यात आले असल्याचे ते म्हणाले.