सांगली : म्हैसाळ येथील ९ जणांच्या हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या सोलापूरच्या मांत्रिकाच्या घरझडतीमध्ये एक डोळ्याचा नारळ, पांढर्‍या कवड्या, धागा बांधलेला नारळ संशयित दोन आरोपीविरूध्द महाराष्ट्र अंधश्रध्दा अधिनियम ३ नुसार कारवाईमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार बैठकीत सांगितले. यावेळी अप्पर अधिक्षक मनिषा दुबुले, उप अधिक्षक अशोक विरकर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हैसाळ येथे वनमोरे कुटुंबातील ९ जणांची हत्या केल्या प्रकरणी सोलापूरचा मांत्रिक अब्बास बागवान व धीरज सुरवसे या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता धयकादायक माहिती समोर आली आहे. १९ जून रोजी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला असून त्या दिवशी संशयितांनी डॉ.माणिक वनमोरे याच्या घरी जेवण केले. गुप्तधन मिळविण्यासाठी १ हजार १०० गहू सात वेळा मोजण्यास सांगण्यात आले. बाटलीत काळ्या गोळ्याची पूड करून विषारी द्रावणाच्या नउ बाटल्या तयार केल्या. यानंतर पोपट वनमोरे याच्या घरी जाउन तिघांना स्वतंत्रपणे बोलावून बाटलीतील द्रव पिण्यास सांगून शांतपणे व स्वतंत्रपणे झोपण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा डॉ. वनमोरे याच्या घरी येऊन याच पध्दतीने उर्वरित सहा जणांना विष पाजले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police suspect that some more people may be involved in the mahisal murder case amy
First published on: 02-07-2022 at 19:10 IST