हर्षद कशाळकर

अलिबाग: रायगड जिल्ह्यतील तीनही आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली आहे. आता या आमदारांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी करण्याचे धोरण शिवसेनेनी स्विकारल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात जाऊन मेळावे घेणे, संघटना टिकून रहावी यासाठी प्रय करणे आणि दुसरम्य़ा बाजूला बंडखोर आमदारांवर टिका टिप्पणी करून त्यांची बदनामी करण्याचे धोरण पक्षनेतृत्वाने स्विकारल्याचे दिसून येत आहे.   कर्जत मधील आमदार महेंद्र थोरवे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेनी काल कर्जत येथे मेळावा घेतला. या मेळाव्याला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने गर्दी जमवून या वेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. कर्जत मधील दोन नगरसेवक आणि दोन पदाधिकारी वगळता, बहुसंख्य पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते. आमदारांच्या बंडामुळे पक्ष संघटनेला कुठलाही धोका निर्माण झाला नसल्याचे या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेनी दाखवून देण्याचा प्रय केला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आमदार महेंद्र थोरवेंवर निशाणा साधला. आमदार महेंद्र थोरवे हेच विकास कामे अडवत होते. त्यांचा नगरपालिकांना निधी देण्यास विरोध होता असा दावाही त्यांनी आपल्या भाषणात केला. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांनाही त्यांनी लक्ष केले.अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी अलिबाग येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. अलिबाग, पेण, रोहा आणि मुरुड तालुक्यातून या मेळाव्यासाठी शिवसैनिकांना बोलविण्यात आले होते. यावेळी राऊतांनी बंडखोर आमदारांवर तोंडसुख घेतले. शंभर गोठय़ातील शेण काढून आमदार महेंद्र दळवी शिवसेनेत आले होते. ते गेले. आता बैल बदलायची वेळ आली असल्याची टिका यावेळी केली. तर महाड भुताला बाटली बंद करण्याची वेळ आली असल्याची टिप्पणी करत अनंत गीते यांनी भरत गोगावले यांच्यावर यावेळी निशाणा साधला. शिवसेनेच्या जुन्या जाणत्या सर्व पदाधिकारम्य़ांना मंचावर बोलवून आमदार एकाकी पडल्याचे चित्र निर्माण करण्यात आला. आमदार गेले तरी शिवसेना संघटना खंबीर असल्याचा संदेश या मेळाव्यांच्या माध्यमातून करण्यात आला. लवकरच महाड येथेही असाच मेळावा घेणार असल्याचे अनंत गीते यांनी जाहीर केले आहे. पक्षांतर्गत कारवाई होऊ नये म्हणून आज जरी बहुसंख्य पदाधिकारी शिवसेनेबरोबर असले तरीत्यामुळे तिनही आमदार जिल्ह्यत परतल्यावर परिस्थिती काय होते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
Ajit Pawar, sunetra pawar
दुभंगलेली मने जोडण्यावर अजित पवारांचा भर
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
Raigad Lok Sabha
शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरे विरोधाची तलवार म्यान