चंद्रपुरात अवैध होडिर्ंग्जच्या गजबजाटाने शहर विद्रुप

सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा व नगर प्रशासन, जिल्हा परिषद, परिवहन महामंडळ, न्यायालय परिसर रेल्वे, पोस्ट विभाग, तसेच शहरातील खासगी इमारती व मोक्याच्या मोकळ्या जागांवर मोठय़ा प्रमाणात जाहिरातींचे अवैध होर्डिग्ज लागलेले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा व नगर प्रशासन, जिल्हा परिषद, परिवहन महामंडळ, न्यायालय परिसर रेल्वे, पोस्ट विभाग, तसेच शहरातील खासगी इमारती व मोक्याच्या मोकळ्या जागांवर मोठय़ा प्रमाणात जाहिरातींचे अवैध होर्डिग्ज लागलेले आहेत. संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र व कराचा भरणा न करताच उभे असलेले हे होडिर्ंग्ज अपघात व शहर विद्रुपीकरणास कारणीभूत ठरले आहेत.

सव्वा चार लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात आज कुठल्याही मार्गाने गेले तर जाहिरातींचे भव्य होडिर्ंग्ज व मुख्य चौकात फ्लेक्स, रस्त्याच्या अगदी बाजूला जाहिरातींचे बोर्ड दिसतात. अगदी सुरुवातीला गांधी चौक, जटपुरा गेट, बसस्थानक व कस्तुरबा चौक या अवघ्या चार मुख्य स्थळी हे जाहिरातींचे होडिर्ंग्ज व बोर्ड दिसायचे. मात्र, गेल्या वष्रेभरात जाहिरात एजन्सींनी हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र वा मनपाचे कराचा भरणा न करताच भव्य होडिर्ंग्ज व फ्लेक्स लावून शहर विद्रुपीकरणाचा जणू विडाच उचलला आहे. प्रियदर्शनी चौक व रेल्वे उड्डाणपुलालगतची बांधकाम विभाग व रेल्वेच्या मोकळ्या जागी लागलेल्या भव्य होडिर्ंग्ज तर अपघातास कारणीभूत ठरले आहे. यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाही. प्रसंगी अपघातात एखाद्याचा जीव सुध्दा जाऊ शकतो. शहरात एखादे होडिर्ंग्ज लावायचे म्हटले तर महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. तसेच संबंधित विभाग किंवा इमारत मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र लागते, परंतु प्रियदर्शनी चौकात सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे तसेच पोस्टाच्या जागेवर मोठे होडिर्ंग्ज लावण्यात आले आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा रेल्वे विभागाची साधी परवानगी घेण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, येथे होर्डीग लावतांना झाडे मध्ये येत असल्याचे बघून संबंधित एजन्सीने झाडाची कत्तल केली आहे. एखादे झाड तोडण्यासाठी वनखात्याची परवानगी लागते, परंतु तीही घेण्यात आलेली नाही. उड्डाणपुलाच्या अगदी बाजूला रेल्वे विभागाच्या मोकळ्या जागेवर उभ्या असलेल्या अवैध होडिर्ंग्जवर रेल्वेच्याच इमारतीवरून लाईट सोडण्यात आलेले आहेत.
होर्डीगमुळे अनेकदा रेल्वे चालकाला या इमारतीवरून दाखविण्यात येणारी लाल व हिरवी झेंडी दिसत नाही. राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकावर जाहिरातींचे मोठे होर्डीग लावण्यात आले आहे. यातील निवडक होडिर्ंग्जची परवानगी घेण्यात आल्याची माहिती आहे, परंतु काही होडिर्ंग्ज अवैधरित्या उभे आहेत. परिवहन विभागाच्या अधिकारी वसाहतीसमोरील मोकळ्या जागेवर होर्डीग असल्याने तेथील लोकांना समोरचे काहीच दिसत नाही. जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी समोर असेच मोठे होर्डीग लागले आहे. तिकडे प्रशासकीय इमारतीतही अवैध होर्डीग लागले असल्याचे बघायला मिळते, तर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात होर्डीग लावण्यास कायद्याने बंदी असतांनाही संपूर्ण परिसरात होर्डीग लागलेले दिसतात.
नागपूर मार्गावर वरोरा नाका चौक, जनता महाविद्यालय चौक, हॉटेल ट्रायस्टार चौकापर्यंत ठिकठिकाणी रस्त्याने, तसेच शासकीय व खासगी इमारतींवर होडिर्ंग्ज लागले आहेत. प्रियदर्शनी चौकात तर एका इमारतींवर इतके होडिर्ंग्ज लागले आहे की, ते खाली कोसळले तर एखाद्याला प्राण गमवावे लागेल इतकी होडिर्ंग्जची गर्दी झाली आहे. कस्तुरबा चौकात होडिर्ंग्जची हीच स्थिती झाली असून एका हॉटेलच्या इमारतीवर मोबाईल टॉवर व त्यालाच पकडून भव्य होर्डीग लागले आहे.
अंचलेश्वर चौक व झरपट नदीलगतच्या मोकळ्या जागेवर असेच अवैध होर्डीग उभे आहे. शहरातील मुख्य गांधी चौकात महापालिकेच्या अगदी इमारतीसमोर होर्डीग लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या आवारातही अनेक होडिर्ंग्ज लागले आहेत. बंगाली कॅम्प चौकात तसेच वरोरा नाका उड्डाणपूललगतच्या कॉम्प्लेक्सवर, कृषी विभागाच्या जागेवर, तसेच रेल्वे लाईनच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेवर होर्डीग लावण्यात आले आहे. हे सर्व होडिर्ंग्ज आज शहरातील वाहतुकीसाठी अडचण झाले आहे. त्याच सोबत शहर विद्रुपीकरणात यामुळे भर पडलेली आहे.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी मनपा आयुक्त शंभरकर यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील अध्रेअधिक होडिर्ंग्ज अवैध असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शहरातील सर्व होडिर्ंग्ज सर्वेक्षणाचे काम मनपाने युध्दपातळीवर हाती घेतले आहे.
या सर्वेक्षणात बहुतांश होडिर्ंग्ज अवैध असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत, तर लवकरच पोलिस दलाची वाहतूक शाखा, उपप्रादेशिक परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपाच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबविण्यात येणार आहे. यात अवैध होडिर्ंग्जसह अपघातस्थळी लागलेले होडिर्ंग्ज काढले जातील.
तसेच ठराविक जागा निश्चित करण्यात येणार आहे. मनपाच्या इमाारतींवरही अवैध होडिर्ंग्ज लागले असल्याची माहिती आयुक्तांना दिली.ही मनमानी रोखण्यासाठी व कामात सुसूत्रता आणण्यासाठी लवकरच कठोर पावले उचलणार असल्याचे शंभरकर म्हणाले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Political banners in chandrapur