मुंबई पुणे मिसिंग लिंक हा केवळ एक रस्ता नाही. हा महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी क्षमतेचा आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा अभिमान आहे. आशियातील सर्वात आव्हानात्मक अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प मानला जातो. अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची सुरक्षा आणि कठोर गुणवत्ता तपासणी यामुळे हा प्रकल्प उभा राहत आहे. परंतु काही विरोधी नेत्यांना इंजिनिअरिंगपेक्षा राजकारणच जास्त समजते. त्यांना दरड आणि बोगद्याच्या संरचनेतील फरकही समजत नाही. नैसर्गिक भूस्खलन आणि बांधकामातील दोष यामधील मूलभूत फरक समजून न घेता भ्रष्टाचाराचा गजर करणे म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शन आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट?

विरोधकांच्या मेंदूतून ‘मिसिंग’ झालेली अक्कल…
मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या नैसर्गिक दरड कोसळण्याच्या घटनेनंतर काही मविआ नेत्यांनी कोणतीही तांत्रिक माहिती न घेता भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची घाई केली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पावर तथ्यांपेक्षा अफवांचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. बोगदा तुटलेला नाही. बोगद्यामध्ये पाणी शिरलेले नाही. प्रकल्पाच्या मुख्य संरचनेला कोणतेही नुकसान झालेले नाही. दरड कोसळली ती बोगद्याच्या बाहेरील डोंगराच्या उतारावर. हा पूर्णपणे नैसर्गिक भूगर्भीय प्रकार आहे. जगातील सर्वात आधुनिक रस्ते आणि बोगद्यांच्या प्रकल्पांमध्येही अशा नैसर्गिक घटना घडतात. त्याचा अर्थ निकृष्ट बांधकाम किंवा भ्रष्टाचार असा होत नाही.

मविआच्या नेत्यांना भ्रष्टाचाराची इतकी सवय झाली आहे की..

मविआच्या काही नेत्यांना भ्रष्टाचाराची इतकी सवय झाली आहे की, प्रत्येक नैसर्गिक घटनेत त्यांना स्वतःचा भूतकाळच दिसतो. तथ्य तपासण्यापेक्षा खोट्या बातम्या पसरवणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणे, हाच त्यांचा राजकीय अजेंडा बनला आहे. ज्यांनी महाराष्ट्राला अनेक वर्षे विकासापासून दूर ठेवले, तेच आज विकासाच्या प्रत्येक प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. त्यांनी आधी महाराष्ट्राला उत्तर द्यावे की २०१३ मध्ये मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाला अडथळे का निर्माण केले? हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता, तर राज्याला त्याचा लाभ अनेक वर्षांपूर्वीच मिळाला असता आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा अभिमान आहे. आशियातील सर्वात आव्हानात्मक अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प मानला जातो. अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची सुरक्षा आणि कठोर गुणवत्ता तपासणी यामुळे हा प्रकल्प उभा राहत आहे. परंतु काही विरोधी नेत्यांना इंजिनिबांधकामातील दोष यामधील मूलभूत फरक समजून न घेता भ्रष्टाचाराचा गजर करणे म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शन आहे. दरड म्हणजे भ्रष्टाचार असता, तर हिमालयातील प्रत्येक भूस्खलनाला भ्रष्टाचार म्हणावे लागले असते. निसर्गाच्या घटना आणि अभियांत्रिकीची गुणवत्ता यांची गल्लत करून महाराष्ट्रात खोटी माहिती पसरवून राज्यातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या नेत्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कारण विकासाच्या प्रकल्पांवर विश्वास कमी करणे म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीवरच आघात करणे होय.

दोन कवडीचे नेते प्रसिद्धीसाठी…

आज आवश्यकता आहे ती जबाबदार राजकारणाची. प्रत्येक नैसर्गिक घटनेत राजकीय संधी शोधण्याची नाही. महाराष्ट्रातील जनता आता तथ्य आणि अफवा यातील फरक ओळखते. बोगदा सुरक्षित आहे, प्रकल्प सुरक्षित आहे आणि महाराष्ट्राचा विकासही अशाच निर्धाराने पुढे जाणार आहे.
काही दोन कवडीचे नेते प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण व्यक्तीवर आरोप करून विकास थांबत नाही. महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहे की, संकटांमध्येही निर्णयक्षम नेतृत्व कसे काम करते.दरड डोंगरावर कोसळली आहे. पण काही विरोधकांचा विवेक, तांत्रिक समज आणि जबाबदारीची भावना मात्र पूर्णपणे कोसळलेली दिसते. महाराष्ट्राला अफवांचे नाही, तर विकासाचे राजकारण हवे आहे.