Poonam Mahajan : लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांचं तिकिट कापण्यात आलं. त्यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना तिकिट देण्यात आलं. मात्र ते निवडून आले नाहीत. याबाबत पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच बाळासाहेब ठाकरेंचीही आठवण सांगितली आहे.

पंकजा आणि माझ्यात कुठलाही संघर्ष नाही

पंकजा आणि माझ्यात काहीही संघर्ष नाही. मात्र तसं चित्र रंगवलं जातं. तिच्या आणि माझ्या वाटा वेगळ्या आहेत. असंही पूनम महाजन यांनी सांगितलं. पंकजा विधान परिषदेवर आहेत. त्या चांगलं काम करत आहेत. आमचे संघर्ष, आमचं बोलणं सुरु असतं. पंकजा या चांगल्या नेत्या आहेत. असंही पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांनी सांगितलं.

sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
sharad ponkshe on maharashtra assembly election
Video: “…तेव्हा आपले सांस्कृतिक मंत्री म्हणाले, तुम्ही नथुराम करत होता?” शरद पोंक्षेंची ‘राजकीय’ टोलेबाजी!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

मुलायमसिंग यादव यांचे मी आशीर्वाद घ्यायचे

“मी संसदेत होते तेव्हा मुलायमसिंग यादव यांचे मी आशीर्वाद घ्यायचे. त्यावेळी ते माझ्या डोक्यावरून हात फिरवायचे. आपल्या प्रमोदची मुलगी आली, असं ते म्हणायचे. फारुख अब्दुला हेदेखील फार प्रेम करायचे. शरद पवारही प्रेम करायचे. ममता बॅनर्जी २०१४-१५ मध्ये संसदेत आपल्या खासदारांना भेटायला आल्या होत्या. त्यावेळी एक खासदार माझ्याकडे आला आणि त्याने मला ममता बॅनर्जींनी बोलवलं आहे, असं सांगितलं. ममता बॅनर्जी यांनीही त्यावेळी मला प्रेमाने मिठी मारली होती,” अशा आठवणीही पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांनी सांगितली.

उद्धव ठाकरेंनी माझ्याबाबतचा उल्लेख भाषणांत केला गेला

“माझं २०२४ मध्ये तिकिट कापण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणांत आणि मुलाखतींमध्ये हा उल्लेख केला की पूनमचं तिकिट कापायला नको होतं. आमचं बोलणं झालं होतं. तिकिट कापलं गेल्यानंतर माझं रश्मी वहिनींशी बोलणं झालं होतं. फोन वगैरे आला नव्हता. पण त्यांनी माझ्याशी संवाद साधला होता. उद्धव ठाकरे आणि मी कॉफी प्यायला भेटतो अनेकदा. तसंच वाईल्डलाईफवर आम्ही बोलतो.” असंही पूनम महाजन म्हणाल्या. लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांनी हे वक्तव्य केलं.

मी उद्धव ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही

मी भाजपा कार्यकर्ता आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की सगळं काही समसमान ठरलं आहे. मग मी भाषणांतून उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारला होता की मुंबई महापालिकेचा कारभार पुढची अडीच वर्षे भाजपाकडे का दिला नाही? मला त्याचं काही उत्तर दिलं नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुममध्ये काम करत होते. मी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काही काळ काम केलं आहे. असंही पूनम महाजन म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी वॉर रुम स्थापन केली होती. त्या वॉर रुममध्ये काम करणारी मी एकमेव खासदार होते. मला त्यातून खूप काही शिकायला मिळालं असंही पूनम महाजन ( Poonam Mahajan ) म्हणाल्या.

हे पण वाचा – Poonam Mahajan : “आजही आठवतं, वडिलांचं रक्त माझ्या हातांना लागलं होतं…”, पूनम महाजन प्रमोद महाजनांच्या आठवणींत भावूक

प्रमोदजी मृत्यूशय्येवर असताना बाळासाहेब ठाकरे भेटायला आले होते

“प्रमोद महाजन रुग्णालयात होते, तेव्हा शेवटच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे त्यांना भेटायला आयसीयूमध्ये आले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे आजारी होते. प्रमोद तुम्ही बरे व्हा, असे बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेब ठाकरे त्यावेळी खूप दु:खी झाले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी होतं. आमचं हे कौटुंबिक नातं आहे.”

Story img Loader