बारामती : केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असून, अधिवेशनात विरोधकांना बोलूच द्यायचे नाही आणि सभागृहात गोंधळ करून हवी ती विधेयके मंजूर करून घेण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. असे चित्र यापूर्वी कधीही नव्हते. हा प्रकार किती दिवस चालणार, हे माहीत नाही. मात्र, आता याचा विचार विरोधकांनी एकत्र बसून करावा, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक आणि खासदार संजय राऊत यांच्या अटकेसाठी सत्तेचा गैरवापर झाला, अशी टीकाही त्यांनी केली.

बारामतीत प्रसार माध्यमांशी बोलताना पवार यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले, की  देशात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. आजपर्यंत कधी असे चित्र पाहिले नाही. याचा विचार करावा लागणार आहे. सत्ताधारी पक्षाने संसदेचा दर्जा राखण्यासाठी महत्त्वाची पाऊले टाकली पाहिजेत. अनिल देशमुख ,नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या अटकेसाठी सत्तेचा गैरवापर झाला. देशमुख आणि राऊत यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळून आलेले  नाही, मात्र घाबरवून सोडण्याचे काम झाले, असेही पवार म्हणाले.

Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
Overthrow the tyrannical government and bring your rightful government at the centre says aditya thackeray
वृद्ध शेतकऱ्याने केली ईडी अन् ५० खोक्यांवर बोलण्याची ‘फर्माईश’; आदित्य ठाकरेंनी केले असे की…

देशात ५६ ते ६० टक्के लोक शेती व शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. पाऊस झाला की शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढते. भारत हा निर्यातदार देश असू शकतो. अर्थव्यवस्थेसाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे. सत्तेवर कुणीही असले तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारावी लागेल. त्या मध्ये राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून काम केले गेले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.