प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि अमरावतीतल्या अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीत अमरावतीची जागा आपल्या पक्षाला मिळावी अशी मागणी केली होती. भाजपा आणि शिंदे गटाकडे एक लोकसभेची जागा (अमरावती) आणि १५ ते २० विधानसभेच्या जागा मागणार आहोत, अशी माहिती दिली होती. तसेच निवडणुकीची तयारी सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान बच्चू कडू यांच्या दाव्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. कारण पक्षाने नुकतीच निवडणुकीसंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.

प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा केली. चौधरी म्हणाले, आगामी निवडणुकीच्या संदर्भात मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आम्ही आगामी निवडणुकीत विधानसभेच्या १५ आणि लोकसभेच्या दोन जागा लढणार आहोत. तसेच जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकाही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. स्थानिक सर्वेक्षणाअंती त्याबाबत निर्णय घेऊ.

akola lok sabha marathi news
लोकसभेच्या प्रचारात विधानसभेच्या इच्छुकांची धडपड
congress leader sonia gandhi choose rajya sabha fear of defeat polls says pm narendra modi
पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
Three candidates named Anant Geete have apply for Lok Sabha election from Raigad Constituency
रायगडमध्ये नामसाधर्म्य उमेदवारांची पंरपरा यंदाही कायम, तीन ‘अनंत गीते’ निवडणुकीच्या रिंगणात
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?

हे ही वाचा >> “आम्ही गांधीवादी विचारांचे पण भाजपा आणि संघाची वाटचाल नथुराम गोडसेच्या…” राहुल गांधींची टीका

अनिल चौधरी म्हणाले, आम्हाला महायुतीत लोकसभा, विधानसभेच्या जागा दिल्या तर त्यांच्यासोबत लढू, नाहीतर स्वबळावर लढू. आम्ही सोलापूरमध्ये विधासनभेच्या दोन जागा लढणार आहोत. अमरावतीसह विदर्भात ७ ते ८ जागा लढणार आहोत. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेची एक जागा आणि विधासनभेच्या दोन जागा लढणार आहोत. आगामी काळात सोलापूर महापालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहोत.